देहरे | १५.७ | राहुल जाधव
गेल्या काही दिवसांपासून देहरे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या जिल्हा सहकारी बँकेच्या प्रतिनिधी निवडीवरून सुरू असलेल्या संघर्षमय घडामोडींना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. Dehere Society Resolution सोसायटीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत माजी चेअरमन भाऊसाहेब रामराव काळे यांच्या नावाचा जिल्हा सहकारी बँकेच्या प्रतिनिधीपदासाठीचा ठराव बिनविरोध मंजूर करण्यात आला.
संचालक मंडळातील सर्व सदस्यांनी एकमताने काळे यांच्या नावाला पाठिंबा दिल्याने कोणताही विरोध न होता Dehere Society Resolution ठराव संमत झाला. या निर्णयामुळे सोसायटीत पुन्हा ऐक्याचे वातावरण निर्माण झाले असून, सहकार क्षेत्रात सकारात्मक संदेश गेला आहे.
Dehere Society Resolution ठराव मंजूर झाल्यानंतर भाऊसाहेब रामराव काळे यांनी संचालक, सभासद, ज्येष्ठ मार्गदर्शक आणि ग्रामस्थांचे आभार मानले. ‘सोसायटीच्या प्रत्येक सभासदाचा विश्वास कायम राखत जिल्हा सहकारी बँकेत देहरे सोसायटीचे प्रभावी प्रतिनिधित्व करेन. शेतकरी, सभासद आणि सहकार चळवळीच्या हितासाठी सातत्याने कार्यरत राहीन, अशी ग्वाही दिली.
या बिनविरोध निवडीचे परिसरातील शेतकरी, सभासद आणि सहकार क्षेत्रातील मान्यवरांनी स्वागत केले. काळे यांच्या अनुभवाचा सोसायटीला तसेच जिल्हास्तरीय सहकार व्यवस्थेला लाभ होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
बैठकीस चेअरमन ताराबाई करंडे, संजय काळे, अर्जुन काळे, विजय लांडगे, मेघनाथ धनवटे, गणदादा काळे, माजी पंचायत समिती सदस्य अरुण पाटील लांडगे, अनिल करंडे, यशवंत काळे, डॉ. जाधव, भानुदास भगत, बाळासाहेब काळे, खरेदी-विक्री संघाच्या संजना विठ्ठल पठारे, माजी पंचायत समिती सदस्य व्ही. डी. काळे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष विठ्ठल पठारे, सरपंच शीतल आणासाहेब चोर, माजी सरपंच बबनराव करंडे, माजी सरपंच मेघनाथ धनवटे, माजी सरपंच अमोल बानकर, संजय लांडगे, उपसरपंच प्रकाश हरी लांडगे, नामदेव पठारे, राहुल करंडे, भानुदास काळे, बापूसाहेब चोर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
देहरे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीतील संघर्षमय घडामोडींना अखेर पूर्णविराम! जिल्हा सहकारी बँकेच्या प्रतिनिधीपदासाठी माजी चेअरमन भाऊसाहेब रामराव काळे यांच्या नावाचा ठराव बिनविरोध मंजूर. संपूर्ण बातमी वाचा – Rayat Samachar. #Dehere #Cooperative #Ahmednagar #RayatSamachar
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.


