Maliwada Gate | माळीवाडा वेशीला उच्च न्यायालयाचे 1संरक्षण; पाडकामावर अंतरिम स्थगिती - Rayat SamacharMaliwada Gate माळीवाडा वेश पाडकामावर उच्च न्यायालयाची स्थगिती; महापालिकेला नोटीस 

Maliwada Gate | माळीवाडा वेशीला उच्च न्यायालयाचे 1संरक्षण; पाडकामावर अंतरिम स्थगिती

ऐतिहासिक वारसा वाचविण्यासाठी जनहित याचिकेला दिलासा; महापालिकेसह राज्य सरकारला नोटीस

रयत समाचार वृत्तसेवा
1 Min Read
उच्च न्यायालयाच्या अंतरिम स्थगितीनंतरचा अहिल्यानगरमधील ऐतिहासिक माळीवाडा वेश.SubEditor | Dipak Shirasath

अहमदनगर | ९.७ | रयत समाचार

(Maliwada Gate) ऐतिहासिक अहमदनगर आणि नविन नाव असलेल्या अहिल्यानगर शहराच्या ऐतिहासिक ओळखीचे प्रतीक असलेल्या माळीवाडा वेश पाडण्याच्या प्रस्तावाला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मोठा ब्रेक लावत अंतरिम स्थगिती दिली आहे. न्यायालयाने या प्रकरणी राज्य सरकार, महापालिका आणि संबंधित यंत्रणांना नोटीस बजावत पुढील सुनावणी ५ ऑगस्ट २०२६ रोजी ठेवली आहे.

(Maliwada Gate) दत्तात्रय हरिभाऊ कावरे यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर न्यायमूर्ती नितीन बी. सूर्यवंशी आणि अभयसाहेब डी. शिंदे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान न्यायालयाने स्पष्ट केले की, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (ASI) यांनी वेळोवेळी दिलेल्या पत्रांनुसार माळीवाडा वेश हे पुरातत्त्वीय व ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचे स्मारक असून, तो राज्याच्या सांस्कृतिक वारशाचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे त्याचे जतन होणे आवश्यक असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले.

Ahilyanagar historic Maliwada Gate after Bombay High Court interim stay order.

(Maliwada Gate) मात्र, या पार्श्वभूमीवरही महापालिकेने माळीवाडा वेश पाडण्याचा ठराव मंजूर केल्याची गंभीर दखल न्यायालयाने घेतली. त्यामुळे अंतिम निर्णय होईपर्यंत पाडकामास स्थगिती देत याचिकेतील प्रार्थना कलम “D” नुसार अंतरिम दिलासा कायम ठेवण्यात आला आहे.
(Maliwada Gate) दरम्यान, न्यायालयाच्या आदेशानंतर माळीवाडा वेश परिसरात वारसा संवर्धनासाठी कार्य करणारे नागरिक, इतिहासप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले. माळीवाडा वेश हा अहिल्यानगरची तथा अहमदनगरच्या ऐतिहासिक वारशाचा महत्त्वाचा भाग असल्याने त्याच्या संरक्षणासाठी इतिहासप्रेमी नागरिकांकडून सातत्याने मागणी होत होती.

History | स्वातंत्र्यप्रेमी महावीर विठोजीराजे होळकरांची एवढी कृर हत्या का? स्मृतिवार्ता, संजय सोनवणी

- Advertisement -

Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading