Shrirampur Entrance Gate | स्व. जयंतराव ससाणे यांचे 1स्वप्न साकार; छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वाराचे लोकार्पण - Rayat SamacharShrirampur Entrance Gate श्रीरामपूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वाराचे लोकार्पण; स्व. जयंतराव ससाणे यांचे स्वप्न साकार

Shrirampur Entrance Gate | स्व. जयंतराव ससाणे यांचे 1स्वप्न साकार; छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वाराचे लोकार्पण

जयंतीदिनी स्वप्नपूर्तीचा ऐतिहासिक क्षण; श्रीरामपूरच्या वैभवात मोलाची भर

रयत समाचार वृत्तसेवा
2 Min Read
श्रीरामपूर येथे स्व. जयंतराव ससाणे यांच्या जयंतीनिमित्त लोकार्पण करण्यात आलेले भव्य छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वारSubEditor | Dipak Shirasath

श्रीरामपूर | ५.६ | सलीमखान पठाण

श्रीरामपूर शहराच्या विकासाला आणि ऐतिहासिक वैभवाला नवी ओळख देणाऱ्या भव्य ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वाराचे’ (Shrirampur Entrance Gate) लोकार्पण रविवारी स्वर्गीय माजी आमदार जयंतराव ससाणे यांच्या जयंतीनिमित्त मोठ्या उत्साहात पार पडले. या लोकार्पण सोहळ्याला नागरिकांची मोठी उपस्थिती लाभली.

हे ही वाचा : Crime | रस्ता ‘चोरी’ला गेला ? नागरिकांना माहिती असावी मनपाच्या ‘ताब्यातील रस्त्यांची नोंदवही’ 

यावेळी आमदार हेमंत ओगले म्हणाले, स्व. जयंतराव ससाणे यांच्या दूरदृष्टीमुळे श्रीरामपूरच्या वैभवात भर पडली आहे. शहराला ऐतिहासिक ओळख देणारे हे प्रवेशद्वार (Shrirampur Entrance Gate) भविष्यात श्रीरामपूरची नवी शान ठरेल.

माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी सांगितले, (Shrirampur Entrance Gate) अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले हे महत्त्वाचे काम नगराध्यक्ष करण ससाणे यांच्या पुढाकारामुळे पूर्णत्वास आले.

Shrirampur Entrance Gate Shrirampur Chhatrapati Shivaji Maharaj Entrance Gate inauguration ceremony

- Advertisement -
माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी आपल्या भाषणात सांगितले, स्व. जयंतराव ससाणे यांनी शहरासाठी पाहिलेले स्वप्न आज प्रत्यक्षात उतरले असून हे प्रवेशद्वार त्यांच्या दूरदृष्टीचे जिवंत स्मारक आहे.
नगराध्यक्ष करण ससाणे यांनी सांगितले, सुमारे १४ ते १५ वर्षांपूर्वी स्व. जयंतराव ससाणे यांनी श्रीरामपूरला भव्य प्रवेशद्वार असावे, अशी संकल्पना मांडली होती. तत्कालीन नगराध्यक्ष संजय फंड आणि सन्मित्र मंडळाचे अध्यक्ष अण्णासाहेब डावखर पाटील यांच्या सहकार्याने या कामाची सुरुवात झाली. समाजातील विविध घटकांच्या आर्थिक व सामाजिक सहकार्यामुळे हे स्वप्न प्रत्यक्षात साकार झाले. यासाठी सर्व सहकार्यकर्त्यांचे त्यांनी आभार मानले.
हे ही वाचा : योगदिन : यम-नियमांची एैशी तैशी; टी.एन. परदेशी यांचा ‘योगसंवाद’ वाचा
कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष संजय फंड, सभापती बाबासाहेब दिघे, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मुरकुटे, सभापती सुधीर नवले, शहराध्यक्ष अण्णासाहेब डावखर, तालुकाध्यक्ष प्रमोद भोसले, उपनगराध्यक्ष कांचन सानप, गटनेते मुजफ्फर शेख, ज्येष्ठ नगरसेवक दिलीप नागरे यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी आणि शहर व ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जयंतीदिनी स्वप्नपूर्तीचा अनोखा योग : स्व. जयंतराव ससाणे यांनी अनेक वर्षांपूर्वी पाहिलेले शहराच्या प्रवेशद्वाराचे स्वप्न त्यांच्या जयंतीदिनीच पूर्णत्वास आल्याने नागरिकांमध्ये विशेष आनंदाचे वातावरण होते. दिवसभर श्रीरामपूरकरांनी प्रवेशद्वाराला भेट देत स्व. ससाणे यांच्या कार्याला अभिवादन केले.

Cultural Politics | एकात्मिक मानववाद, ढोंगाचा बाजार आणि पंडीत दीनदयाळ यांची फसवणूक 


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading