Vasantrao Deshmukh Journalism Award | प्रतिष्ठेचा पत्रकारिता सन्मान जाहीर; महादेव कुलकर्णींना जीवनगौरव, अशोक निंबाळकर मुख्य पुरस्काराचे मानकरी - Rayat SamacharVasantrao Deshmukh Journalism Award श्रीरामपूर नगरपालिकेचे वसंतराव देशमुख पत्रकारिता पुरस्कार जाहीर; महादेव कुलकर्णींना जीवनगौरव

Vasantrao Deshmukh Journalism Award | प्रतिष्ठेचा पत्रकारिता सन्मान जाहीर; महादेव कुलकर्णींना जीवनगौरव, अशोक निंबाळकर मुख्य पुरस्काराचे मानकरी

rayatsamachar
2 Min Read
वसंतराव देशमुख जिल्हास्तरीय पत्रकारिता पुरस्कारांचे मानकरी जाहीर; ३० जुलै रोजी श्रीरामपूर येथे पुरस्कार वितरण सोहळाSubEditor | Dipak Shirasath

श्रीरामपूर | २७.७ | रयत समाचार

(Vasantrao Deshmukh Journalism Award) येथील नगरपालिकेतर्फे दिले जाणारे ज्येष्ठ संपादक वसंतराव देशमुख जिल्हास्तरीय पत्रकारिता पुरस्कार यंदासाठी जाहीर करण्यात आलेत. यावर्षी ज्येष्ठ पत्रकार महादेव कुलकर्णी यांना जीवनगौरव पुरस्कार, तर अशोक निंबाळकर यांना मुख्य पत्रकारिता पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

(Vasantrao Deshmukh Journalism Award) पुरस्कार वितरणाचा भव्य सोहळा ता.३० जुलै रोजी सायंकाळी ४ वाजता नगरपालिकेच्या गोविंदराव आदिक सभागृहात आयोजित करण्यात आला. कार्यक्रमास राज्याचे माजी मंत्री जयंत पाटील आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून, दैनिक लोकमतचे राजकीय संपादक यदु जोशी यांचे विशेष व्याख्यान होणार आहे.

(Vasantrao Deshmukh Journalism Award) यावेळी आमदार हेमंत ओगले, माजी आमदार भानुदास मुरकुटे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, उद्योजक विक्रम सारडा, नगराध्यक्ष करण ससाणे, उपनगराध्यक्ष कांचन सानप, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष सचिन गुजर, मुख्याधिकारी मनोज उकिर्डे, शिक्षण मंडळ सभापती राजेंद्र पवार, बाबासाहेब दिघे, ज्ञानेश्वर मुरकुटे आणि सभापती सुधीर नवले यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

यंदाच्या पुरस्कारार्थींमध्ये रियाज देशमुख, मच्छिंद्र देशमुख, दादासाहेब म्हस्के, दिलीप खरात आणि नीलिमा घाडगे यांचाही समावेश आहे.

विशेष म्हणजे, वसंतराव देशमुख पत्रकारिता पुरस्काराचे हे १४वे वर्ष असून, या पुरस्कारासाठी श्रीरामपूर नगरपालिकेने आपल्या अर्थसंकल्पात ₹३ लाखांची तरतूद केली आहे. पत्रकारिता क्षेत्रातील पुरस्कारांसाठी अशी स्वतंत्र आर्थिक तरतूद करणारी राज्यातील श्रीरामपूर नगरपालिका ही एकमेव नगरपालिका असल्याचा गौरवही यावेळी अधोरेखित करण्यात आला.
पुरस्कार वितरण सोहळ्यास पत्रकार, नागरिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, मुख्याधिकारी, सर्व नगरसेवक-नगरसेविका, श्रीरामपूर पत्रकार संघ आणि प्रेस क्लब यांच्या वतीने करण्यात आले आहे.

 

Image Alt Text:
Vasantrao Deshmukh Journalism Award श्रीरामपूर नगरपालिकेच्या वसंतराव देशमुख पत्रकारिता पुरस्कारांची घोषणा

- Advertisement -

 

नगरपालिकेचे वसंतराव देशमुख पत्रकारिता पुरस्कार जाहीर! ज्येष्ठ पत्रकार महादेव कुलकर्णी यांना जीवनगौरव, तर अशोक निंबाळकर मुख्य पुरस्काराने सन्मानित होणार. पुरस्कार वितरण ३० जुलै रोजी. #RayatSamachar #JournalismAwards #Shrirampur


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading