Khalid Ke Shivaji | कायदेशीर लढाईत 1मोठा विजय! राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त दिग्दर्शक राज मोरे यांचा 'खालिद के शिवाजी' आता Apple TV आणि BookMyShow OTT वर प्रदर्शित - Rayat SamacharKhalid Ke Shivaji कायदेशीर लढाईत विजय; 'खालिद के शिवाजी' Apple TV आणि BookMyShow OTT वर प्रदर्शित

Khalid Ke Shivaji | कायदेशीर लढाईत 1मोठा विजय! राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त दिग्दर्शक राज मोरे यांचा ‘खालिद के शिवाजी’ आता Apple TV आणि BookMyShow OTT वर प्रदर्शित

रयत समाचार वृत्तसेवा
2 Min Read
राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त दिग्दर्शक राज प्रितम मोरे यांचा 'खालिद के शिवाजी' चित्रपट आता Apple TV आणि BookMyShow Stream वर उपलब्ध.SubEditor | Dipak Shirasath

मुंबई | ५.७ | रयत समाचार

(Khalid Ke Shivaji) राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त दिग्दर्शक राज प्रितम मोरे यांच्या ‘खालिद के शिवाजी‘ या बहुचर्चित चित्रपटाने अखेर सर्व कायदेशीर अडथळ्यांवर मात करत मोठे यश मिळवले आहे. दीर्घकाळ चाललेल्या कायदेशीर संघर्षानंतर हा चित्रपट आता Apple TV OTT आणि BookMyShow Stream या प्लॅटफॉर्मवर जगभरातील प्रेक्षकांसाठी प्रदर्शित झाला असल्याची माहिती स्वतः दिग्दर्शक राज प्रितम मोरे यांनी दिली.

Khalid Ke Shivaji OTT release poster by National Award-winning director Raj Pritam More

(Khalid Ke Shivaji) चित्रपटाच्या प्रदर्शनानिमित्त आनंद व्यक्त करताना मोरे म्हणाले, प्रत्येक संकटावर मात करत, विचारांची लढाई विचारांनी जिंकत आणि अन्यायाला निर्भयपणे सामोरे जात आम्ही हा प्रवास पूर्ण केला. आता हा चित्रपट जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचत आहे. सर्वांनी हा चित्रपट आवर्जून पाहावा आणि आपल्या प्रतिक्रिया व शुभेच्छा आम्हाला जरूर कळवाव्यात.

(Khalid Ke Shivaji) छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा आणि आदर्शांचा प्रभावी संदेश देणारा ‘खालिद के शिवाजी’ हा चित्रपट यापूर्वी कान्स फिल्म मार्केट (Marché du Film – Festival de Cannes) तसेच अजिंठा- वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातही प्रदर्शित झाला होता.
या संपूर्ण प्रवासात साथ देणारे निर्माता मायकल थेवर, चित्रपटाची संपूर्ण टीम, तसेच माहिती व प्रसारण मंत्रालय, सीबीएफसी, मुंबई उच्च न्यायालय आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांचे मोरे यांनी विशेष आभार मानले. त्यांनी विशेषतः ज्येष्ठ विधिज्ञ डॉ. विरेंद्र तुळजापूरकर, माजी न्यायमूर्ती मृदुला भाटकर, ॲड. प्रशांत जाधव, ज्येष्ठ अभिनेत्री सुषमा देशपांडे आणि ॲड. जयेश वाणी यांच्या सहकार्याचा आवर्जून उल्लेख केला.
मोरे यांनी सांगितले की, गेल्या आठ महिन्यांच्या या प्रदीर्घ कायदेशीर लढाईत ॲड. जयेश वाणी यांनी प्रत्येक टप्प्यावर मोलाचे मार्गदर्शन आणि भक्कम पाठबळ दिले. त्यामुळेच हा चित्रपट अखेर प्रेक्षकांसमोर आणणे शक्य झाले. चित्रपटाच्या यशामागे प्रेक्षकांचे प्रेम, शुभेच्छा आणि सहकार्य असल्याचे सांगत त्यांनी सर्वांचे आभार मानले.

Yoga Day | 21जून आंतरराष्ट्रीय योगदिन : यम-नियमांची एैशी तैशी; टी.एन. परदेशी यांचा ‘योगसंवाद’ वाचा

- Advertisement -

Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading