DJ Noise Action | डीजेच्या दणदणाटावर पोलिसांचा दणका ! डीजे जप्त; चालक व आयोजकांवर गुन्हे - Rayat SamacharDJ Noise Action श्रीगोंदा पोलिसांची धडक कारवाई; विनापरवानगी डीजे जप्त, गुन्हे दाखल

DJ Noise Action | डीजेच्या दणदणाटावर पोलिसांचा दणका ! डीजे जप्त; चालक व आयोजकांवर गुन्हे

नियमभंग करणाऱ्यांना कडक इशारा

रयत समाचार वृत्तसेवा
2 Min Read
ध्वनी प्रदूषणाविरोधात श्रीगोंदा पोलिसांची कारवाई; विनापरवानगी डीजे जप्त.SubEditor | Dipak Shirasath

श्रीगोंदा | ३.७ | माधव बनसुडे

(DJ Noise Action) ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने श्रीगोंदा पोलिसांनी विनापरवानगी तसेच नियमांचे उल्लंघन करून डीजे वाजवणाऱ्यांविरोधात धडक कारवाई केली आहे. या कारवाईत डीजे साऊंड सिस्टीम जप्त करण्यात आली असून संबंधित चालक व आयोजकांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

DJ Noise Action श्रीगोंदा येथे ध्वनी प्रदूषणाविरोधात पोलिसांनी डीजे जप्त करून कारवाई करतानाचे प्रतीकात्मक छायाचित्र

(DJ Noise Action) शहरातील विविध भागांत पोलिसांनी विशेष तपासणी मोहीम राबविली. यावेळी अनेक ठिकाणी रात्री १० नंतरही कर्णकर्कश आवाजात डीजे सुरू असल्याचे आढळून आले. तसेच स्थानिक पोलीस प्रशासनाची आवश्यक पूर्वपरवानगी न घेता डीजे सुरू असल्याचेही निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संबंधित डीजे संच व साहित्य जागीच जप्त केले.

(DJ Noise Action) याशिवाय नियमबाह्य पद्धतीने मोडिफाय करण्यात आलेल्या डीजे वाहनांबाबतही प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे (RTO) आवश्यक पत्रव्यवहार करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

हे ही वाचा : Crime | रस्ता ‘चोरी’ला गेला ? नागरिकांना माहिती असावी मनपाच्या ‘ताब्यातील रस्त्यांची नोंदवही’

- Advertisement -
पोलीस प्रशासनाने नागरिकांना आणि डीजे चालकांना आवाहन करताना सांगितले की, राज्यात डीजेच्या तीव्र आवाजामुळे हृदयविकाराचे झटके येऊन जीवितहानी झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. तसेच वयोवृद्ध, महिला, लहान मुले आणि आजारी व्यक्तींना अशा ध्वनीचा गंभीर त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे लग्न समारंभांसह सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये डीजेचा वापर टाळावा. आवश्यक असल्यास स्थानिक पोलीस ठाण्याची रीतसर परवानगी घेऊनच पारंपरिक वाद्यांचा वापर करावा.
ध्वनी प्रदूषणाचे नियम मोडणाऱ्यांविरोधात यापुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. नियमभंग होत असल्याचे आढळल्यास नागरिकांनी तातडीने ११२ या आपत्कालीन हेल्पलाईनवर संपर्क साधून तक्रार नोंदवावी. तक्रारदाराची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येईल, असेही पोलिसांनी स्पष्ट केले.

याबाबत पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी नागरिकांना कायद्याचे पालन करून ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.

Yoga Day | 21जून आंतरराष्ट्रीय योगदिन : यम-नियमांची एैशी तैशी; टी.एन. परदेशी यांचा ‘योगसंवाद’ वाचा


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading