Yoga Day | योगातून निरोगी जीवनाचा संदेश; जवाहर विद्यालयात साजरा झाला 21जून आंतरराष्ट्रीय योगदिन - Rayat Samacharजवाहर विद्यालयात आर्ट ऑफ लिव्हिंगच्या सहकार्याने योगदिन Yoga Day उत्साहात साजरा

Yoga Day | योगातून निरोगी जीवनाचा संदेश; जवाहर विद्यालयात साजरा झाला 21जून आंतरराष्ट्रीय योगदिन

आर्ट ऑफ लिव्हिंगच्या मार्गदर्शनाखाली योगासने, सूर्यनमस्कार व प्राणायामाचे सादरीकरण

रयत समाचार वृत्तसेवा
3 Min Read
आर्ट ऑफ लिव्हिंगच्या मार्गदर्शनाखाली चांदा येथील जवाहर विद्यालयात आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात साजरा करण्यात आलाSubEditor | Dipak Shirasath

रयत समाचार

नेवासा | २४.६ | रावसाहेब राशिनकर

तालुक्यातील चांदा येथील जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाच्या जवाहर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात Yoga Day आंतरराष्ट्रीय योगदिन मोठ्या उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्यात आला. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या सहकार्याने आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत योगाचे महत्त्व प्रत्यक्ष कृतीतून अधोरेखित केले.

 

Yoga Day कार्यक्रमासाठी आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षक तुकाराम मुरलीधर जावळे यांनी प्रमुख मार्गदर्शन केले. त्यांच्यासमवेत मंजुषा सुभाष गडाख, सुभाष गडाख, अविनाश जगदाळे आणि शिवाजी कराळे यांनीही विविध योगप्रकारांचे मार्गदर्शन केले. उपस्थितांना योग्य पद्धतीने योगासने, प्राणायाम आणि सूर्यनमस्कार कसे करावेत, तसेच नियमित योगाभ्यासामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य कसे सुदृढ राहते, याविषयी त्यांनी माहिती दिली.

चांदा येथील जवाहर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात Yoga Day आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त विद्यार्थी व शिक्षक योगाभ्यास करताना
जवाहर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त विद्यार्थी व शिक्षक योगाभ्यास करताना
Yoga Day कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य अंशुमन वाकचौरे होते. यावेळी उपप्राचार्य रघुनाथ भोजने, पर्यवेक्षक राजेश शेंडगे, उच्च माध्यमिक विभागाचे समन्वयक प्रा. भाऊसाहेब तांबे, प्रसिद्धी विभाग प्रमुख प्रा. रावसाहेब राशिनकर, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष किरण जावळे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

हे ही वाचा : Human Right | लोकशाहीचा प्राणवायू धोक्यात? महाराष्ट्राच्या नव्या RTI कायद्याविरोधात जनांदोलनाची गरज

- Advertisement -
योगदिनानिमित्त विद्यालयाच्या प्रशस्त परिसरात विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी एकत्रितपणे विविध योगासने, प्राणायाम आणि सूर्यनमस्काराची प्रात्यक्षिके सादर केली. इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत योगाबाबत जागरूकता निर्माण केली. नियमित योगाभ्यासामुळे शरीर सुदृढ राहण्यास, मन शांत ठेवण्यास, एकाग्रता वाढविण्यास तसेच तणावमुक्त जीवन जगण्यास मदत होते, असा संदेश यावेळी देण्यात आला.

हे ही वाचा : योगदिन : यम-नियमांची एैशी तैशी; टी.एन. परदेशी यांचा ‘योगसंवाद’ वाचा

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वाती दळवी, रुक्मिणी सोनवणे, अनिता भांड-राशिनकर, युवराज गायकवाड, फरिदा पठाण, अश्विनी दहातोंडे, अर्चना निराळे, शरयू मरडे, हरीश दगडखैर, जालिंदर शेटे, बबन घोडे, राजेंद्र पाठक, सिराज शेख, संदीप शेंडगे, दीपक निमसे, अनंत शेळके, स्वप्निल मालवंडे, प्रवीण कार्ले, संदीप कासार, रोशन सरोदे, प्रा. भगवान भाबड, प्रा. संदीप बुचकूल, प्रा. भाऊसाहेब पानसरे, प्रा. दिलीप ससे आणि प्रा. रंजना काकड यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा शिक्षिका दीपिका राक्षे तर संजय ढेरे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला, तर शेवटी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. योग हा केवळ एक दिवसापुरता मर्यादित न ठेवता तो दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनविण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

India news | कहाणी गंगाबाईंच्या ‘मिथिला व मैथिल राजवंशाचा इतिहास’ पुस्तकाची; ईसमाद प्रकाशनचे 1 पहिले मराठी पुस्तक


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading