नवी दिल्ली | २४.६ | रयत समाचार
मराठी प्रेक्षकांसाठी महत्त्वाची बातमी म्हणजे BBC Marathi न्यूज आता JioTV आणि JioTV+ या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध झाले आहे. याबाबतची माहिती बीबीसी मराठीचे अभिजीत कांबळे यांनी दिली.
कांबळे यांनी सांगितले की, JioTV वर आता २४ तास BBC Marathi न्यूजचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येणार आहे. या माध्यमातून प्रेक्षकांना केवळ ताज्या बातम्याच नव्हे, तर विविध विषयांवरील सखोल आणि विश्लेषणात्मक कार्यक्रमही पाहायला मिळणार आहेत.
हे ही वाचा : Human Right | लोकशाहीचा प्राणवायू धोक्यात? महाराष्ट्राच्या नव्या RTI कायद्याविरोधात जनांदोलनाची गरज
यामध्ये महत्त्वाच्या घटनांवरील ग्राऊंड रिपोर्ट्स, गुंतागुंतीचे विषय सोप्या भाषेत समजावून सांगणारी ‘सोपी गोष्ट’ मालिका, दिवसातील प्रमुख घडामोडींचा आढावा घेणारा ‘तीन गोष्टी’ कार्यक्रम, शेती आणि ग्रामीण प्रश्नांवरील ‘गावाकडची गोष्ट’, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषण, जगभरातील वेगळ्या आणि प्रेरणादायी कथा, महाराष्ट्रातील मान्यवरांच्या मुलाखतींवर आधारित ‘महाराष्ट्राची गोष्ट’, तसेच तरुणांच्या मनातील प्रश्नांचे तज्ज्ञांकडून निरसन करणारा ‘समज-गैरसमज’ हा कार्यक्रमही BBC Marathi वर उपलब्ध असेल.
अभिजीत कांबळे यांनी सांगितले की, सोशल मीडियावरील अल्गोरिदममुळे अनेकदा महत्त्वाचे वृत्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नाही. मात्र JioTV वर अशा प्रकारचा कोणताही अडथळा नसल्याने प्रेक्षकांना BBC News Marathi चे सर्व कार्यक्रम सहजपणे पाहता येतील.
हे ही पहा : RSYT : अडीच हजार वर्षांपूर्वी विटांवर कोरलेल्या ‘सिंह सेनापती’ कादंबरीचा मराठी अनुवाद
ज्यांच्याकडे JioFiber कनेक्शन आहे, ते आपल्या घरातील टीव्हीवर BBC News Marathi चे थेट प्रसारण पाहू शकतात. तसेच मोबाईलमध्ये JioTV app असल्यास त्यावरही BBC News Marathi चे लाईव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध आहे.
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.



