Yoga Day | योग हा औषधांपूर्वीचा उपचार; निरोगी वृद्धत्वासाठी योगाचा अंगीकार काळाची गरज- डॉ. सुवर्णमाला बांगर - Rayat SamacharInternational Yoga Day Ahmednagar | निरोगी वृद्धत्वासाठी योगाचा अंगीकार काळाची गरज – डॉ. सुवर्णमाला बांगर

Yoga Day | योग हा औषधांपूर्वीचा उपचार; निरोगी वृद्धत्वासाठी योगाचा अंगीकार काळाची गरज- डॉ. सुवर्णमाला बांगर

जिल्हा आयुष रुग्णालयात १२ वा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात

रयत समाचार वृत्तसेवा
3 Min Read
अहमदनगर जिल्हा आयुष रुग्णालयात आयोजित १२ व्या आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमात योगासनांचा सराव करताना उपस्थित नागरिक व मान्यवरSubEditor | Dipak Shirasath

अहमदनगर | २३.६ | रयत समाचार

योग ही भारताची प्राचीन आणि अमूल्य आरोग्य परंपरा असून निरोगी, संतुलित आणि आनंदी जीवनासाठी नियमित योगाभ्यास आवश्यक आहे. वाढत्या जीवनशैलीजन्य आजारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी योग, प्राणायाम आणि ध्यानधारणा यांचा अंगीकार करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हा आयुष रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुवर्णमाला बांगर यांनी Yoga Day निमित्त केले.

 

जिल्हा आयुष रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालय, अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा आयुष रुग्णालयात १२ वा आंतरराष्ट्रीय योग दिन (Yoga Day) उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास शेवगाव ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. दर्शना धोंडे-बारवकर, योगविद्याधामचे संस्थापक सदस्य दत्ता दिकोंडा, उपाध्यक्ष दिलीप कुलकर्णी तसेच परिचर्या महाविद्यालयाच्या प्राचार्या वैशाली कोरडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. सुवर्णमाला बांगर यांच्या उपस्थितीत अहमदनगर जिल्हा आयुष रुग्णालयात आंतरराष्ट्रीय योग दिन Yoga Day कार्यक्रम

- Advertisement -
डॉ. बांगर यांनी Yoga Day निमित्त सांगितले की, योग हे भारताचे वैभव असून आज संपूर्ण जग आरोग्य संवर्धनासाठी योगशास्त्राचा स्वीकार करत आहे. हृदयविकार, मधुमेह, सांधेदुखी आणि मणक्यांच्या विकारांसारख्या असंसर्गजन्य आजारांपासून बचावासाठी नियमित योगाभ्यास, संतुलित आहार आणि आरोग्यदायी जीवनशैलीचा अवलंब आवश्यक आहे.

 

डॉ. दर्शना धोंडे- बारवकर यांनी नियमित योगामुळे शरीर निरोगी व संतुलित राहते, शारीरिक क्षमता वाढते आणि मानसिक तणाव कमी होतो, असे सांगितले. योगविद्याधामचे संस्थापक सदस्य दत्ता दिकोंडा यांनी योग, प्राणायाम आणि ध्यानधारणेचे आरोग्यदायी लाभ स्पष्ट करत असंसर्गजन्य आजारांवर योग प्रभावी ठरत असल्याचे नमूद केले.

 

परिचर्या महाविद्यालयाच्या प्राचार्या वैशाली कोरडे यांनी वैद्यकीय शिक्षणात योगाचे महत्त्व अधोरेखित केले. योग प्रशिक्षण घेतलेल्या परिचारिका रुग्णांना उपचारास पूरक ठरणाऱ्या योगासन, प्राणायाम आणि ध्यानाचे मार्गदर्शन प्रभावीपणे करू शकतात, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी विद्यार्थीनी वैष्णवी पवार यांनी नियमित योगाभ्यासामुळे झालेल्या आरोग्य लाभांचे अनुभव कथन केले.

 

योगविद्याधामच्या योगतज्ज्ञ अंजली कुलकर्णी आणि अर्चना देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थितांनी सूक्ष्म व्यायाम, विविध योगासने, प्राणायाम, ध्यान, ओंकार साधना तसेच विश्वशांतीसाठी प्रार्थना केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शौनक मिरीकर यांनी केले, तर डॉ. अर्चना लांडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. जयश्री म्हस्के, डॉ. शोभा धुमाळ, डॉ. कीर्ती शेळके, डॉ. इरशाद मोमीन, डॉ. नाझिया शेख यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

 

आंतरराष्ट्रीय योग दिन दरवर्षी २१ जून रोजी जगभर साजरा केला जातो. योगाच्या माध्यमातून शारीरिक, मानसिक आणि सामाजिक आरोग्य संवर्धनाचा संदेश देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. योग हा औषधांपूर्वीचा उपचार; निरोगी वृद्धत्वासाठी नियमित योगाभ्यासाचा संदेश

 


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading