अहमदनगर | २१.६ | रयत समाचार
(Rangoli Exhibition) राखी आणि आगामी लग्नसराईच्या हंगामाची चाहूल लागली असून, फॅशनप्रेमी आणि खरेदीचा आनंद घेणाऱ्या नागरिकांसाठी अहिल्यानगरात एका भव्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. ‘रंगोली : लक्झरी फॅशन अँड लाइफस्टाईल एक्झिबिशन’ या प्रतिष्ठित प्रदर्शनाचे आयोजन ४ आणि ५ जुलै २०२६ रोजी एलिट बँक्वेट, हॉटेल संकेत, स्वस्तिक चौक, टिळक रोड, स्टेशन रोड, अहिल्यानगर येथे होणार आहे.
(Rangoli Exhibition) दोन दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात देशभरातील ६० हून अधिक नामांकित आणि एलिट डिझायनर्स सहभागी होणार असून, फॅशन, सौंदर्य आणि लाइफस्टाईलचा अनोखा संगम अनुभवण्याची संधी नागरिकांना मिळेल.
(Rangoli Exhibition) हे केवळ खरेदीचे ठिकाण नसून नवीन फॅशन ट्रेंड, डिझायनर कलेक्शन आणि लक्झरी उत्पादनांची मेजवानी ठरणार आहे. विशेषतः लग्नसराई, साखरपुडा, मेहेंदी, संगीत समारंभ तसेच राखीसारख्या सणांसाठी आवश्यक असलेले आकर्षक पोशाख आणि अक्सेसरीज या प्रदर्शनात उपलब्ध असतील. आधुनिकतेसोबत भारतीय परंपरेचा संगम साधणारे विविध डिझायनर ब्रँड्स या प्रदर्शनात सहभागी होत असल्याने प्रत्येक वयोगटातील ग्राहकांसाठी विविध पर्याय उपलब्ध राहणार आहेत.
हे ही वाचा : atheism | नास्तिकता : एक सुदृढ जीवनशैली – टी.एन.परदेशी
प्रदर्शनात डिझायनर साड्या, लेहेंगा, गाऊन्स, इंडोवेस्टर्न पोशाख, ब्रायडल कलेक्शन, पुरुषांसाठी एथनिक वेअर, फॅशन ज्वेलरी, डायमंड व पारंपरिक दागिने, लक्झरी अक्सेसरीज, होम डेकोर वस्तू, गिफ्ट आयटम्स तसेच विविध लाइफस्टाईल उत्पादने एकाच ठिकाणी पाहता व खरेदी करता येणार आहेत. अनेक प्रसिद्ध डिझायनर्स आपल्या नवीन कलेक्शनचे सादरीकरण याच प्रदर्शनातून करणार असल्याने फॅशन क्षेत्रातील नव्या ट्रेंडची झलकही पाहायला मिळणार आहे.
विशेष म्हणजे, प्रदर्शनात येणाऱ्या ग्राहकांना विविध डिझायनर ब्रँड्सशी थेट संवाद साधण्याची संधी मिळणार असून, आपल्या आवडीनुसार पोशाख किंवा दागिन्यांची निवड करता येणार आहे. त्यामुळे लग्नसराईची खरेदी करणाऱ्या कुटुंबांसाठी हे प्रदर्शन विशेष आकर्षण ठरणार आहे. महिलांसोबतच पुरुष आणि तरुणाईसाठीही विविध फॅशन कलेक्शन उपलब्ध असल्याने संपूर्ण कुटुंबासाठी ही खरेदीची पर्वणी ठरणार आहे.
प्रदर्शनासाठी प्रवेश पूर्णपणे मोफत ठेवण्यात आला असून, दररोज सकाळी ११ ते रात्री ९ या वेळेत नागरिकांना भेट देता येणार आहे.
शहरासह जिल्ह्यातील नागरिकांनी कुटुंबीयांसह या प्रदर्शनाला भेट देऊन उत्कृष्ट दर्जाच्या फॅशन आणि लाइफस्टाईल उत्पादनांचा अनुभव घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले. अधिक माहितीसाठी इच्छुकांनी ९५२९९०२७१८, ९३२५७१४२४९ किंवा ६२६४०३८०४४ या क्रमांकांवर संपर्क साधावा.
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.



