Ad imageAd image

Politics | दिल्लीत पून्हा एकदा विखे-शाह भेट; अमित शाह यांचे आशीर्वाद, जनहिताच्या विषयांवर चर्चा?

रयत समाचार वृत्तसेवा
1 Min Read
SubEditor | Dipak Shirasath

नवी दिल्ली | १५.६ | रयत समाचार

(Politics) जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज नवी दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची सदिच्छा भेट घेण्यात आली. यावेळी खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि डॉ. राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते.

(Politics) भेटीदरम्यान अमित शाह यांनी डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आशीर्वाद दिले. त्यांच्या शुभेच्छा आणि आशीर्वादामुळे नव्या जोमाने जनसेवेचे कार्य करण्यासाठी ऊर्जा व प्रेरणा मिळाल्याची भावना डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केली.

(Politics) यावेळी ‘गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी जल यात्रा’चा पवित्र कलश अमित शाह यांना सुपूर्द करण्यात आला. तसेच विविध राजकीय घडामोडी, विकासकामे आणि जनहिताच्या विषयांवर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दिल्लीतील या भेटीमुळे विखे कुटुंब आणि भाजपच्या केंद्रीय नेतृत्वातील सुसंवाद पुन्हा एकदा अधोरेखित झाला असून, आगामी काळातील विविध विकासात्मक उपक्रमांबाबतही सकारात्मक चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.

 


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading