पाथर्डी | ९.६ | रयत समाचार
(Public issue) ग्रामपंचायतीच्या कामकाजाची माहिती मागणाऱ्या एका तरुणाला ग्रामसेवकाने चपलेने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार पाथर्डी तालुक्यात उघडकीस आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ग्रामपंचायत प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
(Public issue) मिळालेल्या माहितीनुसार, पाथर्डी तालुक्यातील अकोला येथील ग्रामसेवक अशोक खेडकर यांच्याकडे गावातील तरुण बबन गर्जे यांनी ग्रामपंचायतीच्या कामकाजासंदर्भातील माहिती मागितली होती. मात्र माहिती देण्याऐवजी ग्रामसेवकाचा संताप अनावर झाल्याने त्यांनी संबंधित तरुणाला चपलेने मारहाण केल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे.
(Public issue) याशिवाय, माहितीसाठी दिलेला लेखी अर्जदेखील ग्रामसेवकाने फाडून टाकल्याचा गंभीर आरोप बबन गर्जे यांनी केला आहे. नागरिकांना माहिती मिळावी, पारदर्शक प्रशासन निर्माण व्हावे आणि ग्रामपंचायतींमध्ये उत्तरदायित्व वाढावे यासाठी शासन विविध योजना राबवत असताना, अशा प्रकारची घटना समोर आल्याने संताप व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे, राज्य शासनाच्या “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान” अंतर्गत ग्रामपंचायतींमध्ये पारदर्शक व लोकाभिमुख प्रशासनाचा पुरस्कार केला जातो. मात्र माहिती मागणाऱ्या नागरिकालाच मारहाण होत असेल, तर हे अभियान नेमके कोणासाठी, असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, व्हायरल झालेल्या व्हिडिओची प्रशासनाने गंभीर दखल घेऊन संबंधित ग्रामसेवकावर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
माहिती मागितली, उत्तरात मिळाली चप्पल! पाथर्डी तालुक्यातील या घटनेने ग्रामपंचायत प्रशासनातील पारदर्शकतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
(व्हिडिओ पाहण्यासाठी लिंक : https://youtu.be/bR7Qc-O3_2E?si=tDuK5VZ0G_uImK6f)
Public issue | तासन्तास वीज गेली? ग्राहक नुकसान भरपाई मागू शकतो; महावितरणचे नियम काय सांगतात?
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.

