अहमदनगर | ८.६ | रयत समाचार
(Press) येथील ज्येष्ठ पत्रकार, इतिहासाचे अभ्यासक आणि पत्रकारिता क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्त्व भूषण देशमुख यांच्या निधनानंतर त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मंगळवारी ता. ९ जून रोजी दुपारी ३ वाजता श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व पत्रकार आणि सीएसआरडी संस्थेतर्फे ही सभा आयोजित करण्यात आली.
(Press) सीएसआरडी महाविद्यालयाच्या सभागृहात होणाऱ्या या श्रद्धांजली सभेत पत्रकार, विद्यार्थी, सहकारी तसेच सर्वसामान्य नागरिकांनाही सहभागी होता येणार आहे. देशमुख यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले.
(Press) भूषण देशमुख यांनी दीर्घकाळ शहरात पत्रकारिता करताना सामाजिक, ऐतिहासिक आणि वैचारिक विषयांवर आपली वेगळी छाप निर्माण केली. त्यांनी सीएसआरडीमध्ये पत्रकारिता विषयाचे अध्यापन केले असून अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच स्नेहालय संचलित ‘रेडिओ नगर’चे संचालक म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय कार्य केले.
त्यांच्या निधनामुळे पत्रकारिता, इतिहास अभ्यास आणि सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त होत आहे.
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.

