Ad image

वैज्ञानिक क्षेत्रात उंचावला परभणीचा झेंडा; प्रा.डॉ. संतोष रणखांब यांना मिळाला आंतरराष्ट्रीय Excellence in Scientific Contribution Award

रयत समाचार वृत्तसेवा
2 Min Read
SubEditor | Dipak Shirsath

परभणी | ८.६ | रयत समाचार

जिल्ह्यातील सोनपेठ येथील कै. रमेश वरपूडकर महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक प्रा. डॉ. संतोष वसंतराव रणखांब यांना २०२६ सालचा आंतरराष्ट्रीय स्तरावरील अत्यंत प्रतिष्ठेचा Excellence in Scientific Contribution Award प्रदान करून गौरविण्यात आले. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे सोनपेठसह संपूर्ण परभणी जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले.

हा प्रतिष्ठेचा पुरस्कार उत्तर प्रदेशातील Agricultural Technology Development Society (ATDS), Ghaziabad यांच्या वतीने थायलंडमधील बँकॉक येथे आयोजित करण्यात आलेल्या 10th International Conference on Climate Smart Natural Resources Management for Sustainable Agriculture & Allied Sciences (CSNRM-2026) दरम्यान प्रदान करण्यात आला.

बँकॉक येथील AIT Conference Centre मध्ये संपन्न झालेल्या या आंतरराष्ट्रीय परिषदेत विविध देशांतील संशोधक, वैज्ञानिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञ सहभागी झाले होते. प्राणीशास्त्र (Zoology) क्षेत्रातील प्रा. डॉ. रणखांब यांच्या महत्त्वपूर्ण संशोधनकार्याची, सातत्यपूर्ण शैक्षणिक योगदानाची आणि वैज्ञानिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा सन्मान त्यांना बहाल करण्यात आला.

प्रा. डॉ. रणखांब यांच्या या यशामुळे सोनपेठ शहराच्या आणि परभणी जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, त्यांच्या या यशाबद्दल मित्रपरिवार, सहकारी, विद्यार्थी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

याबाबत भावना व्यक्त करताना गणेश पाटील यांनी सांगितले, डॉ. संतोष रणखांब यांचा संशोधनाचा प्रवास प्रेरणादायी असून, त्यांनी मिळविलेला हा सन्मान संपूर्ण शैक्षणिक क्षेत्रासाठी अभिमानास्पद आहे.

प्रा. डॉ. रणखांब यांच्या पुढील शैक्षणिक, संशोधन आणि वैज्ञानिक वाटचालीसाठी सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

 

Public issue | तासन्‌तास वीज गेली? ग्राहक नुकसान भरपाई मागू शकतो; महावितरणचे नियम काय सांगतात?

 


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading