अहमदनगर | २२.५ | रयत समाचार
(Education) कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांची रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागीय अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांनी ही नियुक्ती जाहीर केली. यापूर्वी हे पद कोपरगावचे राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गट) नेते आशुतोष काळे यांच्याकडे होते.
(Education) रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागात अहिल्यानगर जिल्ह्यासह परिसरातील शाळा व महाविद्यालयांचा समावेश होतो. संस्थेचे विभागीय कार्यालयही नगर शहरात असून जिल्ह्यातील अनेक जुनी व महत्त्वाची शैक्षणिक केंद्रे या विभागात येतात. त्यामुळे या पदाला संस्थात्मक आणि राजकीयदृष्ट्याही विशेष महत्त्व मानले जाते.
(Education) अलीकडेच रयत शिक्षण संस्थेची नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. अध्यक्षपदी शरद पवार यांची फेरनिवड झाली असून कार्यकारिणीत काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर उत्तर विभागाची जबाबदारी आता रोहित पवार यांच्याकडे सोपविण्यात आली.
रोहित पवार हे गेल्या अनेक वर्षांपासून संस्थेच्या कार्यकारिणीत सक्रिय आहेत. आता उत्तर विभागीय अध्यक्षपदाच्या माध्यमातून त्यांना कर्जत ते कोपरगाव या विस्तृत पट्ट्यात काम करण्याची संधी मिळणार आहे. अलीकडच्या काळात पक्षात त्यांच्या नाराजीच्या चर्चांना उधाण आले होते. त्या पार्श्वभूमीवर त्यांना संस्थेमध्ये महत्त्वाची जबाबदारी देण्यात आल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले.
India news | आरक्षण, स्पर्धा परीक्षा आणि लॅटरल एन्ट्री : नेमकं कुणासाठी चाललंय सरकार?
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.
