Literature | मसाप विभागीय कार्यवाहपदी जयंत येलूलकर; नगर वाचनालयात सत्कार

रयत समाचार वृत्तसेवा
1 Min Read
SubEditor | Dipak Shirasath

अहमदनगर | १७.५ | रयत समाचार

(Literature) नगर वाचनालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वसंत व्याख्यानमालेत ज्येष्ठ साहित्यिक व सांस्कृतिक कार्यकर्ते जयंत येलूलकर यांचा महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणेच्या विभागीय कार्यवाहपदी एकमताने निवड झाल्याबद्दल तसेच शहराच्या साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल सत्कार करण्यात आला.

(Literature) यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणेचे अध्यक्ष तथा नामवंत अभिनेते योगेश सोमण यांच्या हस्ते येलूलकर यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमास नगर वाचनालयाचे प्रमुख कार्यवाह विक्रम राठोड, पदाधिकारी ज्योती कुलकर्णी, जिल्हा ग्रंथालय अधिकारी रामदास शिंदे, संयोजिका शिल्पा रसाळ तसेच साहित्यप्रेमी व मान्यवर रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

(Literature) कार्यक्रमात जयंत येलूलकर यांच्या साहित्य, संस्कृती आणि सामाजिक क्षेत्रातील कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

Public issue | महापालिकेचा महत्त्वपूर्ण निर्णय; रस्त्यांवरील अपघातात जखमी वा मृत्यू झाल्यास मिळणार नुकसान भरपाई

India news | कहाणी गंगाबाईंच्या ‘मिथिला व मैथिल राजवंशाचा इतिहास’ पुस्तकाची; ईसमाद प्रकाशनचे 1 पहिले मराठी पुस्तक


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading