Law | इनाम जमीन प्रस्तावित कायदा 18 मे रोजी विशेष चर्चासत्र; सहभागी होण्याचे ‘चॅरिटी लॉयर्स’चे आवाहन

रयत समाचार वृत्तसेवा
1 Min Read
SubEditor | Dipak Shirasath

अहमदनगर | १६.५ | रयत समाचार

(Law) इनाम जमिनी प्रस्तावित कायदा या संदर्भात शासनस्तरावर प्रस्तावित करण्यात आलेल्या नव्या कायद्याच्या पार्श्वभूमीवर येत्या सोमवारी ता. १८ मे २०२६ रोजी अहिल्यानगर येथे विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. या प्रस्तावित कायद्याचा मूळ मसुदा ज्येष्ठ विधिज्ञ नरेश गुगळे यांनी तयार केला असून, त्यातील कायदेशीर तरतुदी, परिणाम आणि नागरिकांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी हे चर्चासत्र महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

(Law) हे चर्चासत्र दुपारी १२:३० वाजता सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, अहिल्यानगर येथे पार पडणार असून विविध क्षेत्रातील नामवंत कायदेतज्ज्ञ, वरिष्ठ वकील आणि अधिकारी उपस्थित राहून इनाम जमीन प्रस्तावात कायदा बाबत मार्गदर्शन करणार आहेत.

(Law) या चर्चासत्रासाठी धर्मादाय उपायुक्त एन.व्ही. जगताप, सहाय्यक धर्मादाय आयुक्त व्ही.डी. शेंडे, ज्येष्ठ विधिज्ञ व मसुदाकार नरेश गुगळे यांच्यासह वरिष्ठ वकील मंडळी प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
इनाम जमिनी प्रस्तावित कायदा संदर्भातील प्रस्तावित कायद्यामुळे ट्रस्ट, संस्था, जमीनधारक आणि संबंधित घटकांवर होणारे परिणाम, कायदेशीर प्रक्रिया तसेच भविष्यातील दिशा याविषयी सखोल चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती आयोजक ‘चॅरिटी लॉयर्स’ यांच्या वतीने देण्यात आली.
या महत्त्वपूर्ण विषयावर अधिकृत माहिती मिळवण्यासाठी तसेच आपल्या मनातील शंका मांडण्यासाठी संबंधितांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन चॅरिटी लॉयर्स यांनी केले.


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading