Social | शब्दांशी नातं जपणाऱ्या सुषमा जाधव-अमर यांना अभिवादनासाठी 19 मे रोजी सभा

रयत समाचार वृत्तसेवा
1 Min Read
SubEditor | Dipak Shirasath

अहमदनगर | १८.५ | रयत समाचार

(Social) अहिल्यानगर आकाशवाणीच्या निवृत्त उद्गोषिका तसेच दैनिक लोकमतच्या माजी उपसंपादीका ॲड. सुषमा जाधव-अमर यांचे ता. ६ मे रोजी अल्पश: आजाराने आकस्मिक निधन झाले. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी पत्रकारिता, निवेदन आणि सामाजिक क्षेत्रात असीम धैर्य व जिद्दीचा आदर्श निर्माण केला होता. त्यांच्या कार्याला आणि स्मृतींना अभिवादन करण्यासाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

(Social) अभिवादन सभा मंगळवारी ता.१९ मे २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता ग्रामीण विकास अभ्यास केंद्र (सीएसआरडी-आयएसडब्ल्यूआर), स्टेशन रोड, अहमदनगर महाविद्यालयासमोर, अहिल्यानगर येथे होणार आहे. सभेत सुषमा जाधव-अमर यांच्या सहकाऱ्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर त्यांच्या आठवणींना उजाळा देणार आहेत.

(Social) यावेळी नागरिक, पत्रकार, साहित्यप्रेमी व स्नेहींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे आयोजन जे.सी.पी.आर. माजी विद्यार्थी संघ, कॉम्रेड भास्कर जाधव स्मृती प्रतिष्ठान, ग्रामीण विकास अभ्यास केंद्र तसेच जाधव, बंडेलू व अमर परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.

 


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading