Politics | 292 व्या रविवारीही स्वच्छतेचा संकल्प कायम; भाजप व धर्मवीर युवा मंडळाची स्वच्छता मोहीम

रयत समाचार वृत्तसेवा
1 Min Read
SubEditor | Dipak Shirasath

अहमदनगर | १०.५ | रयत समाचार

(Politics) प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या ‘स्वच्छ भारत अभियान’ला प्रतिसाद देत भारतीय जनता पार्टी व धर्मवीर युवा, कला, क्रीडा व सांस्कृतिक बहुउद्देशीय मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ता. १० मे रोजी सलग २९२ व्या रविवारी स्वच्छता मोहीम राबवून सामाजिक बांधिलकी जपली.

Politics

(Politics) अर्बन बँक कॉलनीतील अहिल्यानगर महानगरपालिकेच्या ओपन स्पेसमध्ये ही मोहीम उत्साहात पार पडली. परिसरातील कचरा संकलन, स्वच्छता आणि नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्याचे काम कार्यकर्त्यांनी केले.

(Politics) दर रविवारी शहरातील विविध भागांत जाऊन सातत्याने स्वच्छता मोहीम राबविण्यात येत असल्याची माहिती अजय चितळे यांनी दिली.
या उपक्रमामुळे परिसर स्वच्छ राहण्यास मदत होत असून नागरिकांमध्येही सकारात्मक संदेश जात असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी भाजप व धर्मवीर युवा मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.

India news | कहाणी गंगाबाईंच्या ‘मिथिला व मैथिल राजवंशाचा इतिहास’ पुस्तकाची; ईसमाद प्रकाशनचे 1 पहिले मराठी पुस्तक


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading