Social | स्व.रेव्ह. चांदोरीकर स्मृतिप्रीत्यर्थ विचारमंथन सभेचे आयोजन; ख्रिस्ती साहित्यविश्वातील तेजस्वी व्यक्तिमत्त्व - Rayat Samachar

Social | स्व.रेव्ह. चांदोरीकर स्मृतिप्रीत्यर्थ विचारमंथन सभेचे आयोजन; ख्रिस्ती साहित्यविश्वातील तेजस्वी व्यक्तिमत्त्व

रयत समाचार वृत्तसेवा
1 Min Read
SubEditor | Dipak Shirasath

अहमदनगर | १०.५ | रयत समाचार

(Social) ख्रिस्ती साहित्य क्षेत्रात आपल्या अभ्यासपूर्ण लेखन, वैचारिक योगदान आणि सामाजिक बांधिलकीमुळे विशेष ओळख निर्माण करणारे ज्येष्ठ साहित्यिक व धर्मसेवक स्व. रेव्ह. सुभाष म. चांदोरीकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी ‘आदरांजली व विचारमंथन सभा’ आयोजित करण्यात आली आहे.

(Social) सीएसआरडी समाजकार्य व संशोधन संस्था तसेच ख्रिस्ती अस्मिता साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी ता. ११ मे रोजी सकाळी १० वाजता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाचे स्थळ सीएसआरडी समाजकार्य व संशोधन संस्था, अहिल्यानगर येथे असणार आहे.

(Social) या विचारमंथन सभेचा मुख्य विषय ‘ख्रिस्ती अस्मिता साहित्य प्रवाह’ असा असून, स्व. चांदोरीकर यांच्या साहित्यिक, सामाजिक आणि आध्यात्मिक कार्याचा आढावा घेत त्यांच्या विचारांचा वारसा जतन करण्याचा प्रयत्न यावेळी केला जाणार आहे.
ख्रिस्ती साहित्य चळवळीमध्ये स्व. रेव्ह. सुभाष म. चांदोरीकर यांनी केलेले योगदान महत्त्वपूर्ण मानले जाते. त्यांच्या निधनामुळे साहित्य आणि समाजकार्य क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असून विविध स्तरातून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे.
कार्यक्रमास साहित्यिक, धर्मगुरू, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले.

Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading