मुंबई | १८.२ | रयत समाचार
(Politics) अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या वैयक्तिक व गट कर्ज व्याज परतावा योजनेची कार्यपद्धती अधिक सुलभ व पारदर्शक करण्यात आली. महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख यांनी १३ एप्रिल २०२६ रोजी याबाबत सुधारित प्रणालीची माहिती दिली.
(Politics) नवीन प्रणालीअंतर्गत बँक स्तरावर अपूर्ण कागदपत्रांमुळे ‘Reject’ झालेली प्रकरणे आता लाभार्थ्यांना त्यांच्या लॉगिनमधून पाहता येणार आहेत. तसेच, संबंधित कागदपत्रांची पूर्तता लाभार्थ्यांना स्वतः ऑनलाईन अपलोड करून करता येणार आहे. कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर पात्र प्रकरणांसाठी ‘Submit’ पर्याय उपलब्ध होऊन पुढील कार्यवाहीसाठी अर्ज मुख्यालयाकडे पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना कार्यालयात वारंवार जाण्याची गरज राहणार नाही.
(Politics) व्याज परतावा क्लेम प्रक्रियेतही बदल करण्यात आला आहे. ‘Hold’ स्थितीत असलेल्या प्रकरणांमध्ये लाभार्थ्यांनी १५ दिवसांच्या आत त्रुटींची पूर्तता करणे आवश्यक असून, त्यासाठी जिल्हा समन्वयकांमार्फत प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. याशिवाय, सुधारित प्रणालीमध्ये क्लेम ‘Sent for CAFO’ या स्तरावर पोहोचताच पुढील क्लेम सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
Biodiversity | अहिल्यानगरचा ‘किंगफिशर’ आता पाण्याच्या बाटलीवर; ‘डेक्कन व्हॅली’ मिनरल वॉटर
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.
