Politics | नारी शक्तीचा गौरव सोहळा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान

रयत समाचार वृत्तसेवा
1 Min Read

मुंबई | १५.४ | रयत समाचार

(Politics) येथे आज ता. १५ रोजी नारी शक्ती विचार मंचतर्फे आयोजित ‘नारी शक्ती वंदन संमेलन’ मोठ्या उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवली. यावेळी त्यांनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान केला.

(Politics) कार्यक्रमात सन्मानित करण्यात आलेल्या महिलांमध्ये पद्मश्री रविना टंडन (अभिनेत्री), अर्चना कोचर (फॅशन डिझायनर), स्नेहलता स्वामी (तहसीलदार), रूबल नागी (ग्लोबल टीचर पुरस्कार विजेत्या), वैशाली सामंत (गायिका), प्राजक्ता माळी (अभिनेत्री), प्रा. उज्ज्वला चक्रदेव (एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाच्या कुलगुरू) तसेच मंत्री अदिती तटकरे यांचा समावेश होता.

(Politics) या संमेलनाच्या माध्यमातून विविध क्षेत्रात कर्तृत्व गाजवणाऱ्या महिलांचा गौरव करताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले. तसेच, महिलांनी सर्व क्षेत्रांत पुढे येत समाजाच्या विकासात मोठा वाटा उचलावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांसह मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

 


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading