मुंबई | २५.३ | रयत समाचार
(Politics) कर्नाटक सरकारने दाखल केलेल्या एफआयआर प्रकरणावरून महाराष्ट्र- कर्नाटक वाद अधिक तीव्र होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकवर गंभीर आरोप करत हा एफआयआर राजकीय दबावाखाली नोंदवण्यात आल्याचा दावा केला आहे.
(Politics) फडणवीस म्हणाले, कर्नाटकने जे काही केलं आहे, त्याच पद्धतीने आमचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील मुंबईतील पोलीस ठाण्यात कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांविरोधात झिरो एफआयआर नोंदवू शकतात. मात्र, अशा प्रकारच्या कारवाईसाठी झिरो एफआयआर चा वापर करणे योग्य नाही.
(Politics) ते पुढे म्हणाले, कायद्याच्या चौकटीत राहून संबंधित व्यक्तींना न्यायालयात जाण्याचा अधिकार आहे. कोर्टाच्या आदेशानुसार एफआयआर नोंदवला जाऊ शकतो. परंतु, कर्नाटकने राजकीय हेतूने आणि दबावाखाली तपास सुरू असल्याचे भासवून महाराष्ट्राची मानहानी करण्याचा प्रयत्न केला आहे.
या वक्तव्यामुळे दोन्ही राज्यांतील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त होत आहे. महाराष्ट्र सरकार या प्रकरणावर पुढील कायदेशीर पावले उचलणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

