पुणे | १३.३ | रयत समाचार
(Literature) मैत्री पब्लिकेशनकडून प्रकाशित होणाऱ्या झेन मास्टर सुदस्सन लिखित ‘झेन कथा’ आणि प्रा. सुधीर भालेराव लिखित ‘कात्रजचा घाट- एक सावध खेळी’ या दोन पुस्तकांचा प्रकाशन सोहळा ता.१५ मार्च रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला. कार्यक्रम भारत इतिहास संशोधन मंडळ, सदाशिव पेठ, पुणे येथे पार पडणार आहे.
(Literature) ग्रंथप्रकाशन डॉ. श्रीपाल सबनीस (माजी अध्यक्ष- अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन) यांच्या हस्ते होणार असून लेखक झेन मास्टर सुदस्सन (संस्थापक- झेन फाउंडेशन, पुणे) आणि लेखक प्रा. सुधीर भालेराव यांच्यासह सिने कला दिग्दर्शक संतोष संखद विशेष उपस्थिती लाभणार आहे.
(Literature) ‘कात्रजचा घाट’ या पुस्तकाचे लेखक प्रा. सुधीर भालेराव असून त्यांच्या लेखनातून समाजातील वास्तव आणि मानवी अनुभवांचे प्रभावी चित्रण वाचकांसमोर येणार आहे. तसेच ‘झेन कथा’ या पुस्तकातून जीवनातील साधेपणा, शांतता आणि आध्यात्मिक विचारांची ओळख करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला साहित्यप्रेमी, वाचक, लेखक व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मैत्री पब्लिकेशनच्या मोहिनी कारंडे यांनी केले.
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.
