नगर तालुका | रयत समाचार
(Disaster Management) तालुक्यातील पिंपळगाव माळवी गावात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मेजर विश्वनाथ गुंड व मेजर बबन झिने या माजी सैनिक व नानासाहेब झिने या शेतकऱ्यांचा तब्बल दहा टनापेक्षा जास्त कांदा पाण्यात वाहून गेला. तर विष्णू साबळे यांच्या गोठ्यात पाणी शिरल्याने जनावरांसह गोठ्याचेही मोठे नुकसान झाले आहे.
(Disaster Management) अतिवृष्टीच्या पावसामुळे शेतकरी हतबल झाले असून, वर्षभराच्या कष्टाचा अक्षरशः चुराडा झाला आहे. पिकांसोबतच साठवलेले उत्पादन पाण्यात वाहून जाण्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे.
(Disaster Management) ग्रामीण भागात अनेक ठिकाणी हीच परिस्थिती असून शेतमजूर, ग्रामीण कारागीर यांना शासनाने तात्काळ १० हजार रूपये मदत द्यावी तसेच शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.


