पुणे | १८.६ | रयत समाचार
(India news) भारताच्या बँकिंग व्यवस्था आणि एकूणच अर्थव्यवस्थेवर भाष्य करणाऱ्या ‘The Great Indian Illusion’ या माहितीपटाचे स्क्रीनिंग सोमवारी ता. १६ जून रोजी पुण्यातील महावीर जैन विद्यालयाच्या सभागृहात पार पडले. यावेळी देशाच्या आर्थिक स्थितीवर सखोल चर्चा झाली असून, माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा आणि माजी केंद्रीय मंत्री तसेच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांवर तीव्र टीका केली.
(India news) माहितीपट पाहिल्यानंतर बोलताना यशवंत सिन्हा आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी, देशाची अर्थव्यवस्था ही अशिक्षित लोकांच्या ताब्यात गेली असून, सध्या विकासापेक्षा दिखाव्यावर अधिक भर दिला जात आहे, असे मत व्यक्त केले. अर्थव्यवस्थेतील वास्तव परिस्थिती आणि बँकिंग क्षेत्रातील आव्हानांवर गंभीरपणे विचार करण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.
माहितीपटाचे दिग्दर्शन वरुण सुखराज यांनी केले असून, संशोधन व लेखन संचित डहाके यांचे तर निर्मिती सीए प्रसाद झावरे यांनी केली.
(India news) कार्यक्रमाला निवृत्त न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील, माजी खासदार वंदना चव्हाण, असीम सरोदे, विश्वंभर चौधरी, दिग्दर्शक सुनील सुकथनकर, प्रशांत कोठडिया, गोपाळ तिवारी, डॉ. सतीश देसाई यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माहितीपटाच्या माध्यमातून देशाच्या आर्थिक धोरणांबाबत प्रश्न उपस्थित करत उपस्थितांमध्ये व्यापक चर्चा घडून आली. कार्यक्रमानंतरही अर्थव्यवस्था, बँकिंग व्यवस्था आणि सार्वजनिक धोरणांवर उपस्थितांनी मतांची देवाणघेवाण केली.
Human Right | लोकशाहीचा प्राणवायू धोक्यात? महाराष्ट्राच्या नव्या RTI कायद्याविरोधात जनांदोलनाची गरज
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.



