Ram Temple Trust | मी अधिकृत स्वाक्षरीकर्ता नाही, चढाव्याच्या मोजणीत माझी भूमिका नव्हती; कोषाध्यक्ष गोविंददेव गिरीच्या पत्रानंतर 1नवी चर्चा - Rayat Samacharराम मंदिर ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंददेव गिरी यांचे पत्र; 'मी अधिकृत स्वाक्षरीकर्ता नाही' म्हणत केले महत्त्वाचे खुलासे

Ram Temple Trust | मी अधिकृत स्वाक्षरीकर्ता नाही, चढाव्याच्या मोजणीत माझी भूमिका नव्हती; कोषाध्यक्ष गोविंददेव गिरीच्या पत्रानंतर 1नवी चर्चा

अयोध्या राममंदिर चोरी प्रकरणी स्पष्टीकरण; पत्रकार अजित अंजूम यांची तीव्र प्रतिक्रिया 

रयत समाचार वृत्तसेवा
2 Min Read

अयोध्या | ६.७ | रयत समाचार

(Ram Temple Trust) अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिरातील कथित चढावा चोरी प्रकरणानंतर श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी याने रामभक्तांना उद्देशून सविस्तर पत्र प्रसिद्ध केले. या पत्रात त्यांनी ट्रस्टच्या आर्थिक व्यवहारांतील आपल्या भूमिकेबाबत अनेक महत्त्वाचे खुलासे करत स्वतःला चढाव्याच्या दैनंदिन व्यवस्थापनापासून दूर असल्याचे स्पष्ट केले.

(Ram Temple Trust) गोविंददेव गिरी याने पत्रात नमूद केले आहे की, ते ट्रस्टचे अधिकृत स्वाक्षरीकर्ता (Authorized Signatory) नाहीत. ट्रस्टच्या नावाने त्यांच्याकडे कोणतेही चेकबुक नव्हते आणि आर्थिक व्यवहारांवर त्यांच्या स्वाक्षऱ्या वापरल्या जात नव्हत्या. तसेच, रामलल्लाच्या हुंडीत जमा होणाऱ्या चढाव्याची मोजणी किंवा त्या प्रक्रियेशी आपला कधीही संबंध नव्हता, असे स्पष्ट केले.

(Ram Temple Trust) पत्रानुसार, चढाव्याची मोजणी स्थानिक विश्वस्त आणि संबंधित अधिकृत समितीकडून केली जात होती. त्या प्रक्रियेसाठीची SOP (Standard Operating Procedure) देखील त्यांच्याकडूनच तयार करण्यात आली होती. बँकेसोबत तयार करण्यात आलेली ही SOP आपल्याला गेल्या महिन्यात प्रथमच दाखविण्यात आली, असेही गोविंददेव गिरी याने म्हटले.

तसेच, चोरी नेमकी कधी, कशी आणि किती झाली, हा तपासाचा विषय असून त्याची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणीही त्यांनी पत्रातून केली.

दरम्यान, या पत्रानंतर ज्येष्ठ पत्रकार तथा संपादक अजित अंजूम यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत, जर ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वतःच सांगत असतील की त्यांचा चढाव्याच्या व्यवस्थापनाशी संबंध नव्हता, तर प्रत्यक्ष कारभार कोणाच्या हाती होता? असा प्रश्न उपस्थित केला.

हे ही वाचा : योगदिन : यम-नियमांची एैशी तैशी; टी.एन. परदेशी यांचा ‘योगसंवाद’ वाचा

त्यांनी पुढे असा दावा केला की, चढाव्याच्या व्यवहारांचे प्रत्यक्ष नियंत्रण ट्रस्टचे महासचिव चंपत राय आणि विश्वस्त अनिल मिश्रा यांच्याकडे होते. मात्र, अजित अंजूम यांनी केलेले हे दावे त्यांच्या वैयक्तिक विश्लेषणाचा भाग असून त्याबाबत संबंधित ट्रस्टकडून स्वतंत्र अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. तसेच या प्रकरणाचा तपास सुरू असून अंतिम सत्य तपास अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे.

Cultural Politics | एकात्मिक मानववाद, ढोंगाचा बाजार आणि पंडीत दीनदयाळ यांची फसवणूक 

- Advertisement -

Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading