नवी दिल्ली | ८.५ | रयत समाचार
(World news) जगभरातील महिला दिग्दर्शिकांच्या सशक्त आणि अकथित गोष्टी प्रेक्षकांपर्यंत पोहोचविणाऱ्या ‘Women’s Voices Now Film Festival 2026’ या ऑनलाइन चित्रपट महोत्सवाला सुरुवात झाली असून हा महोत्सव २० मेपर्यंत घरबसल्या पाहता येणार आहे. ३९ चित्रपट आणि २६ विविध संस्कृतींचे प्रतिनिधित्व करणारा हा आंतरराष्ट्रीय महोत्सव महिला दिग्दर्शिकांच्या सर्जनशीलतेचा आणि सामाजिक भानाचा प्रभावी आविष्कार ठरत आहे.
(World news) या महोत्सवामध्ये जगभरातील महिलांनी दिग्दर्शित केलेले धाडसी, विचारप्रवर्तक आणि अनकथित वास्तव मांडणारे चित्रपट प्रदर्शित केले जात आहेत. महिला अनुभव, सामाजिक प्रश्न, मानवी भावना आणि विविध सांस्कृतिक पार्श्वभूमी यांचे प्रभावी चित्रण या चित्रपटांमधून पाहायला मिळणार आहे.
महोत्सवासाठी प्रेक्षकांना ‘ऑल- एक्सेस पास’ उपलब्ध करून देण्यात आला असून LEGACY20 हा प्रोमो कोड वापरल्यास २० टक्के सवलत मिळणार आहे. आयोजकांनी चित्रपटप्रेमींना Watch. Reflect. Be moved या संदेशाद्वारे या वैश्विक चित्रपट अनुभवाचा भाग होण्याचे आवाहन केले आहे.
(World news) महोत्सवाबाबत अधिक माहिती आणि ऑनलाइन स्ट्रीमिंगसाठी भेट द्या – Women’s Voices Now Film Festival 2026
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.
