अहमदनगर | २१ सप्टेंबर | यशवंत तोडमल
women बोल्हेगाव उपनगरातील ओंकार महिला गणेश मंडळाच्या वतीने गेल्या १५ वर्षांपासून गणपतीची भव्य मिरवणूक आयोजित केली जाते. महिलांच्या वतीने दहा दिवस विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येतात. विशेष म्हणजे यात वर्गणी, भंडारा जेवणानासह मंडळाची विविध कामे महिलाच करतात. यावर्षी फेटे बांधून पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी मंडळाच्या अध्यक्षा वैशाली राजहंस, सचिव अनिता भोसले आणि सदस्य कोमल भोसले यांच्यासह मंदा रोठे, कल्याणी चौधरी, मीनाक्षी साळुंखे, शितल मुंगुस्कर, पुनम दांगट, वर्षा नरोडे, बेबीबाई जाधव, दीपा जमादार, शिल्पा गोरे, छाया गडाख, शितल गडाख, अर्चना भाटे, सीमा पारखे, पूजा महाजन, श्रुतिका पगारे, शितल शेंडगे, सीमा दिघे, वैशाली आस्वार, पूजा चव्हाण, कल्पना पाटील, विजया सदभोर, वैजयंता हेंबाडे, अंजली गायके, दीपा लोखंडे, वंदना गोरे, प्रतिभा देशपांडे, सारिका सांब, उज्वल गडाख, शितल भोरे, शितल आंग्रे, स्नेहल लहाडे, रोहिणी शिंगवेकर, सिद्धेश्वरी तरटे, कल्पना तळेकर, नयन खंदारे, मंदा लाटे आदींनी जल्लोषात बाप्पाला निरोप दिला.
कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा
हे हि वाचा : History: द इंडियन्स : दक्षिण आशियाच्या इतिहास अभ्यासकांसाठी उपयोगी संदर्भग्रंथ – श्रध्दा कुंभोजकर
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.