नवी दिल्ली | १.३ | रयत समाचार
(India news) भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (ASI) अंतर्गत औरंगाबाद मंडळाशी संबंधित एमटीएस पदावरील १/३० दर्जा प्राप्त नैमित्तिक कर्मचाऱ्यांच्या नियमितीकरणाबाबत सकारात्मक हालचाली सुरू झाल्या आहेत. याबाबत केंद्रीय संस्कृती व पर्यटनमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी लेखी पत्राद्वारे आश्वासन दिले आहे.
(India news) अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार निलेश लंके यांनी ता.१६ डिसेंबर २०२५ रोजी केंद्रीय मंत्र्यांकडे या प्रश्नासंदर्भात प्रत्यक्ष भेट घेऊन पत्रव्यवहार केला होता. त्यानंतर मंत्री शेखावत यांनी १८ फेब्रुवारी २०२६ रोजी उत्तर देत संबंधित कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर गांभीर्याने विचार सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे.
(India news) पत्रात नमूद केल्याप्रमाणे, कार्यरत श्रमिकांना कोणतीही अन्यायकारक अडचण येऊ नये यासाठी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग दक्ष आहे. तसेच कर्मचारी निवड आयोगाच्या माध्यमातून एमटीएस पदांची भरती करताना विद्यमान मार्गदर्शक तत्त्वांनुसार आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, असेही त्यांनी म्हटले आहे.
या संदर्भात खासदार लंके यांनी केंद्रीय मंत्र्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सविस्तर चर्चा केली होती. एमटीएस कर्मचाऱ्यांच्या दीर्घकालीन प्रलंबित मागण्यांबाबत केंद्र सरकार सकारात्मक असल्याचे या पत्रातून स्पष्ट होत असल्याने संबंधित कर्मचाऱ्यांमध्ये आशावाद निर्माण झाला आहे.
दरम्यान, कर्मचाऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी पाठपुरावा सुरूच राहील, असेही खासदार लंके यांनी स्पष्ट केले आहे.
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.
