अहमदनगर | १५ जानेवारी | प्रतिनिधी
(sports) येथील एमआयडीसीच्या जिमखाना मैदानावर पाच दिवसीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्या हस्ते करण्यात आले. अंबिका उद्योग समूह संचलित अंबिका क्रिकेट क्लबच्या वतीने या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. एल ॲण्ड टी कंपनीचे व्यवस्थापक अरविंद पारगावकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माणिक चौधरी उपस्थित होते.
हे ही पहा : कॉम्रेड शहीद भगतसिंह स्मारकाची एल अँड टी आणि मनपाने केली दूर्दशा #live #l&t #amc
(sports) खेळाडूंना चालना देण्यासाठी अंबिका उद्योग समूहाच्या माध्यमातून दरवर्षी हिवाळी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. प्रथम विजेत्या संघास १ लाख, उपविजेत्या संघास ७१ हजार, तृृतीय विजेत्या संघास ५१ हजार व चौथ्या संघास ३१ हजारांचे रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक व खेळाडूस प्रत्येकी ५ हजार रुपयांचे बक्षिस दिले जाणार आहे. या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, शहरासह जिल्ह्यातील संघांनी यामध्ये सहभाग नोंदवला आहे.
(sports) आयुक्त डांगे म्हणाले, खेळातून युवकांमध्ये एक संघाची भावना निर्माण होते. मोबाईलच्या आहारी गेलेल्या युवकांना मैदानी खेळातून बाहेर पडता येणार आहे. खेळातून मन व शरीर सदृढ बनते. पराभवाने खचून न जाता पुन्हा जिद्दीने पुढे जाण्याचे व विजयाने हुरळून न जाता पुढे वाटचाल करण्याचे खेळाडूवृत्ती मैदानी खेळातून विकसीत होत असते. यासाठी पालकांनी मुलांना मैदानाकडे घेऊन येण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
हे ही पहा : अहिल्यानगरमधे ‘ह्युमन राईट व्हायलेंस’ जिल्हाधिकारी सालीमठ यांनी बोगस लेआऊट तात्काळ रद्द करावा
(sports) स्पर्धा आयोजनासाठी एमआयडीसीतील उद्योजक केशव नागरगोजे, बाळासाहेब बडे, विक्रमशेठ बन्सल (पुणे), बाबूशेठ नागरगोजे, कुंडलिक कातोरे, सागर आमले, महेश (पप्पू) वाकळे, अंकुश बडे, समीर शेलार (सुपा), भरत रोडे, हेमंत खत्री, संग्राम खिलारी, वैभव शेटिया, विनायक भोर, सुनील खामनेकर, संकेत भोर, रवी पवार, संजय बडे यांचे सहकार्य केले आहे. वैयक्तिक पारितोषिकांसाठी राहुल कातोरे, चैतन्य बडे, अजित भांडे, संतोष उगले, नितीन मनोद, राजेंद्र जायभाय, शरद महापुरे, संतोष भोसले, धिरज रामनानी, इंद्रजित बजाज, संजय रसाळ, विश्वास कंटेनर, किशोर कोलते, श्रीनाथ ॲग्रो इंडस्ट्रिज, राहुल कातोरे, हॉटेल अनिकेत, धिरज सिंग, ॲड. पोपट बडे, डॉ. रवींद्र पगारे, आशिष रमनानी, बच्चनसिंग नागाल, बाळासाहेब मोरे, राजू चौधरी, रावसाहेब पुंड यांनी मदत केली आहे.
या स्पर्धेचा अंतिम सामना ता. १९ जानेवारी रोजी रंगणार असून, विजेत्या, उपविजेत्या व इतर संघांसह वैयक्तिक बक्षीसे मान्यवरांच्या हस्ते दिली जाणार आहे. सामन्यातील खेळाडूंंना अंबिका ग्रुपच्या वतीने वैयक्तिक बक्षिसे दिली जाणार आहेत. स्पर्धेत प्रवेेश केलेल्या संघातील खेळाडूंना केशव नागरगोजे व बाळासाहेब बडे यांच्याकडून टी-शर्ट देण्यात आले आहे.
हे हि वाचा : श्रीगोंद्याचे थोर वारकरी संत : शेख महंमद – टी.एन.परदेशी यांची ‘साहित्यवार्ता’ वाचा
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.