social media: सामाजिक माध्यमाची सकारात्मक ताकत : सेल्फी विथ् दिल्लीगेट #selfywithdilligate

80 / 100 SEO Score

समाजसंवाद | १५ ऑगस्ट | भैरवनाथ वाकळे

social media सोमवार, १३ ऑगस्ट २०१८. एका इतिहासप्रेमी दोस्ताचा अंधारपडता फोन आला. बापू, एका महत्वाच्या मिटींगमधून अहमदनगर महानगरपालिका अतिक्रमणविरोधी पथकाचे प्रमुख अधिकारी हे मराठा सेवा संघाचे पुरूषोत्तम खेडेकर साहेबांना ऑफिसचे अर्जंट काम आहे सांगून गडबडीने निघून गेले. काहीतरी भानगड आहे.

आम्ही नक्की काय भानगड आहे? या शोधाच्या मागे लागलो. काही वेळाने शोध लागला. सुत्रांनी पक्की खबर दिली. प्रिंट माध्यमातील जाणत्या माहितगारास कळविले आणि social media  मोहिम सुरू झाली.
सर्वात आधी थेट दिल्लीगेट वेशीजवळ जावून दिल्लीगेटसोबत मस्तपैकी सेल्फी काढली आणि फेसबुकवर #SelfywithDilligate #SelfywithDeligate #सेल्फी_विथ_दिल्लीगेट #savedilligate #save_delhigate मोहिम सुरू केली.FB IMG 1723684755571

पहाता पहाता मोहिमेने जोर धरला. शहरासह जगभरातील अहमदनगरप्रेमी जनतेने मोठा प्रतिसाद दिला. काही वेळेतच दिल्लीगेटजवळ शेपाचशे दिल्लीगेटप्रेमी जमा झाले. सामाजिक माध्यमांवर सेल्फींचा पाऊस पडत होता. काहींनी प्रशासनाविरोधात खरमरीत पोस्ट लिहल्या. काहीजण दिल्लीगेटवेशीला नारळ फोडत होते. काहीजण हळहळत होते. काहीजण प्रशासनाला जाब विचारायच्या मुडमध्ये होते. गर्दीला हटविण्यासाठी शेवटी पोलिस आले. लोकांना कनव्हेन्स करता करता त्यांच्या नाकीनऊ आले. इतिहासप्रेमी जनता ऐकायलाच तयार नव्हती. शेवटी रात्री दिडवाजेपर्यंत लोक दिल्लीगेटजवळून हललेच नाहीत. पोलिस कंटाळले. अतिक्रमण पथक तिकडेच लटकून बसले. शेवटी मोहिम फत्ते झाली.FB IMG 1723684760084
संध्याकाळी ७ वाजता दिल्लीगेट वाचविण्याची सुरू झालेली मोहिम रात्री १:३० वाजता जवळजवळ संपली. दिल्लीगेट वाचले !
सोशल मिडीयाचा सकारात्मक वापर करता येतो, हे पुन्हा एकदा सिध्द झाले. याबाबतची दै. महाराष्ट्र टाईम्समधे आलेली सविस्तर बातमी वाचा.

FB IMG 1723656326204

संभाजी तोडमल यांची १४ ऑगस्ट २०१८ रोजीची यासंबंधी पोस्ट वाचा : https://www.facebook.com/share/p/PnyuBNUSoLH6N8kM/?mibextid=oFDknk

FB IMG 1723684757862

कृपया, वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा 

हे हि वाचा : श्रीगोंद्याचे थोर वारकरी संत : शेख महंमद – टी.एन.परदेशी यांची ‘साहित्यवार्ता’ वाचा

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *