Press | ‘LGBTQ अँड मीडिया रायटिंग’ यशस्वी; अनुभव समृद्ध करणारे ‘लिखो’ मिडीया समिट

SubEditor | Dipak Shirasath

नवी दिल्ली | ३.३ | रयत समाचार

(Press) येथे २८ फेब्रुवारी रोजी हमसफर ट्रस्टच्या वतीने आयोजित करण्यात आलेला ‘LGBTQ अँड मीडिया रायटिंग’ हा एकदिवसीय मीडिया समीट उत्साहात पार पडला. ‘लिखो‘ मिडीया सत्रे अत्यंत अभ्यासपूर्ण, माहितीपूर्ण आणि भावनिकदृष्ट्याही समृद्ध करणारी ठरल्याची माहिती सहभागी पत्रकार शर्मिष्ठा भोसले यांनी दिली.

(Press) समीटच्या सुरुवातीलाच LGBTQ समुदायाला माणूस म्हणून संवेदनशीलपणे मांडणाऱ्या दोन-तीन जाहिराती दाखवण्यात आल्या. प्रसिद्ध ‘विक्स’च्या जाहिरातीत सामाजिक कार्यकर्त्या श्रीगौरी सावंत यांचे दर्शन घडताच वातावरण भावनिक झाले.

(Press) ‘हमसफर ट्रस्ट’चे चेअरमन सुहेल खान यांनी संस्थेचा आजवरचा प्रवास, संघर्ष आणि कार्यपद्धती याविषयी अत्यंत पारदर्शकपणे मांडणी केली. संस्थेचेच रवेंद्र यांनी घेतलेल्या जेंडर विषयक इंटरॅक्टिव्ह सत्रात अनेक गैरसमज दूर करत नव्या संकल्पना उलगडून दाखवल्या.

सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस करणारे वकील वैभवसिंग यादव यांनी संविधानातील आणि कायद्यातील LGBTQ समुदायासंदर्भातील तरतुदी, वेळोवेळी झालेल्या कायदेशीर बदल, त्यामागील संघर्ष आणि राजकीय संदर्भ यांचा सविस्तर ऊहापोह केला. या चर्चेदरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी भारतीय लोकशाहीसाठी किती व्यापक आणि संवेदनशील विचार करून संविधानाची निर्मिती केली, याची प्रकर्षाने जाणीव झाली.

Contents
नवी दिल्ली | ३.३ | रयत समाचार(Press) येथे २८ फेब्रुवारी रोजी हमसफर ट्रस्टच्या वतीने आयोजित करण्यात आलेला ‘LGBTQ अँड मीडिया रायटिंग’ हा एकदिवसीय मीडिया समीट उत्साहात पार पडला. ‘लिखो‘ मिडीया सत्रे अत्यंत अभ्यासपूर्ण, माहितीपूर्ण आणि भावनिकदृष्ट्याही समृद्ध करणारी ठरल्याची माहिती सहभागी पत्रकार शर्मिष्ठा भोसले यांनी दिली.(Press) समीटच्या सुरुवातीलाच LGBTQ समुदायाला माणूस म्हणून संवेदनशीलपणे मांडणाऱ्या दोन-तीन जाहिराती दाखवण्यात आल्या. प्रसिद्ध ‘विक्स’च्या जाहिरातीत सामाजिक कार्यकर्त्या श्रीगौरी सावंत यांचे दर्शन घडताच वातावरण भावनिक झाले.(Press) ‘हमसफर ट्रस्ट’चे चेअरमन सुहेल खान यांनी संस्थेचा आजवरचा प्रवास, संघर्ष आणि कार्यपद्धती याविषयी अत्यंत पारदर्शकपणे मांडणी केली. संस्थेचेच रवेंद्र यांनी घेतलेल्या जेंडर विषयक इंटरॅक्टिव्ह सत्रात अनेक गैरसमज दूर करत नव्या संकल्पना उलगडून दाखवल्या.

पुढील सत्रात हमसफर ट्रस्टच्या शिवा यांनी सोनाली खान, ‘ह्युमन्स ऑफ क्वीर’चे यश, कार्यकर्त्या सोनल गियानी आणि नाझ फाऊंडेशनचे साहिल चौधरी यांच्याशी संवाद साधला. अनुभवातून आलेले मुद्दे, प्रत्यक्ष कामातील आव्हाने आणि मीडिया कसा अधिक जबाबदार ठरू शकतो यावर सखोल चर्चा झाली.

‘लिखो’ मिडीया समीटमध्ये बिहार, झारखंड, मध्य प्रदेश, काश्मीर आणि दिल्ली येथील पत्रकार सहभागी झाले होते. विविध राज्यांतील सांस्कृतिक आणि पत्रकारितेचा अनुभव शेअर करत नव्या मैत्री जुळल्या. परस्परांना आपल्या शहरात होस्ट करण्याचे आश्वासन देत संवादाची नवी दारे उघडली गेली, अशी माहिती शर्मिष्ठा भोसले यांनी दिली.

एकूणच, हा एकदिवसीय समीट पत्रकारितेची दृष्टी व्यापक करणारा, सामाजिक संवेदनशीलता वाढवणारा आणि व्यावसायिकदृष्ट्या समृद्ध करणारा ठरल्याचे भोसले यांनी सांगितले.

हे ही वाचा : Social | सामाजिक संघर्ष कमी करण्याचे ‘भिवंडी मॉडेल’; ‘खोपडे पॅटर्न’ : एक भारतीय प्रयोग, जागतिक मान्यता

Mithila va Maithila Rajavamshacha Itihasa By Gangabai


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading