Business | दैनिक लोकआवाज पुरस्काराने अनिरुद्ध अडसूळ यांचा गौरव; न्यूक्लिअस हॉस्पिटलकडून सत्कार - Rayat Samachar

Business | दैनिक लोकआवाज पुरस्काराने अनिरुद्ध अडसूळ यांचा गौरव; न्यूक्लिअस हॉस्पिटलकडून सत्कार

समाजहितासाठी कार्य करण्याचा संकल्प

rayatsamachar
1 Min Read
SubEditor | Dipak Shirasath

अहमदनगर | १.३ | रयत समाचार

(Business) दैनिक लोकआवाजच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा पुरस्कार अडसूळ एज्युकेशनचे संस्थापक चेअरमन अनिरुद्ध अडसूळ यांना जाहीर झाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. न्यूक्लिअस हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटर येथे झालेल्या कार्यक्रमात पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.

- Advertisement -

(Business) यावेळी न्यूक्लिअस हॉस्पिटलचे डॉ. गोपाल बहुरूपी, संचालिका व महिला बालरोग तज्ज्ञ डॉ. चेतना बहुरूपी तसेच महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यकारिणी विश्वस्त राजेंद्र चोभे उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी अडसूळ यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा गौरव करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

(Business) अनिरुद्ध अडसूळ यांनी शिक्षणक्षेत्रात सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम राबवले असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेत दैनिक लोकआवाजने त्यांना पुरस्कार प्रदान करण्याचे जाहीर केले. यावेळी सर्वांनी अडसूळ यांच्या कार्याचा आदर्श घेऊन समाजहितासाठी कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला.

हे ही वाचा : Public issue | महापालिकेचा महत्त्वपूर्ण निर्णय; रस्त्यांवरील अपघातात जखमी वा मृत्यू झाल्यास मिळणार नुकसान भरपाई; प्रशासक यशवंत डांगे यांचे अर्ज करण्याचे आवाहन

India news | कहाणी गंगाबाईंच्या ‘मिथिला व मैथिल राजवंशाचा इतिहास’ पुस्तकाची; ईसमाद प्रकाशनचे 1 पहिले मराठी पुस्तक


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading