Culture | आरसीएफमध्ये सॅबी परेरा यांची रंगतदार प्रकट मुलाखत; मराठी भाषा गौरवदिनी विशेष कार्यक्रम

SubEditor | Dipak Shirasath

मुंबई | १.३ | रयत समाचार

(Culture) आरसीएफ लिमिटेड या निमसरकारी कंपनीच्या चेंबूर येथील आस्थापनेमध्ये मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात प्रसिद्ध मराठी साहित्यिक सॅबी परेरा यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते.

(Culture) कार्यक्रमात आरसीएफचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी संतोष वझे यांनी सॅबी परेरा यांची प्रकट मुलाखत घेतली. मराठी भाषा, साहित्य, संस्कृती आणि आजच्या काळातील भाषिक आव्हाने या विषयांवर झालेल्या या संवादाला श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

(Culture) प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून रंगलेल्या या मुलाखतीत परेरा यांनी आपल्या साहित्यप्रवासातील अनुभव, लेखनातील प्रेरणा आणि मराठी भाषेच्या जतन-संवर्धनाबाबतचे विचार मांडले. कार्यक्रमासाठी शंभरेक श्रोते उपस्थित होते. संपूर्ण सभागृहात उत्साही वातावरण निर्माण झाले होते. उपस्थित कर्मचाऱ्यांनीही संवादात सक्रिय सहभाग नोंदवत कार्यक्रम अधिक रंगतदार केला.

यावेळी सॅबी परेरा यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले, आरसीएफसारख्या प्रतिष्ठित संस्थेत मराठी भाषा गौरव दिन साजरा होत असल्याचा आनंद आहे. कार्यक्रमात धमाल मजा आली. आयोजन करणारे आणि आदरातिथ्य करणारे कंपनीच्या मानव संसाधन विभागाचे अधिकारी पंकज पाटील, कंपनीचे व्यवस्थापन आणि उपस्थित सर्व श्रोत्यांचे मनःपूर्वक आभार.

मराठी भाषेच्या संवर्धनासाठी उद्योग क्षेत्रातील अशा उपक्रमांचे विशेष महत्त्व असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. कार्यक्रम उत्साहात आणि यशस्वीरीत्या पार पडला.

हे ही वाचा : Public issue | बळजबरीच्या सिमेंट काँक्रीट रस्त्यांचे गुपीत; सिमेंट कंपन्यांच्या लाभासाठी पब्लिकच्या माथी सिमेंट प्रदूषण

Mithila va Maithila Rajavamshacha Itihasa By Gangabai


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading