अहमदनगर | १८.६ | समीर मन्यार
(Social) ज्येष्ठ नागरिक संघ, स्टेशन परिसर (अहिल्यानगर) यांच्या २२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन आगरकर मळा येथे उत्साहपूर्ण आणि खेळीमेळीच्या वातावरणात करण्यात आले. सभेच्या अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष के.डी. खानदेशे होते.
(Social) यावेळी उपस्थित ज्येष्ठ सदस्यांना मार्गदर्शन करताना खानदेशे म्हणाले की, उत्तम आरोग्य हीच ज्येष्ठांची खरी संपत्ती आहे. एकमेकांविषयी आदरभाव ठेवत तणावमुक्त आणि आनंदी जीवन जगावे. देवाचे नामस्मरण, सकारात्मक विचार आणि आवडीनुसार छंद जोपासल्यास आयुष्य अधिक आनंददायी होते. संघाच्या सदस्यांच्या सहकार्यामुळे विविध सामाजिक उपक्रम सातत्याने राबविले जात असून त्यामुळे स्टेशन परिसरातील ज्येष्ठ नागरिक संघाने स्वतंत्र अशी ओळख निर्माण केल्याचे त्यांनी सांगितले.
(Social) संघाचे सचिव अशोक आगरकर यांनी वार्षिक अहवाल सादर करताना सांगितले, संघाने यशस्वीपणे २२ वर्षांचा प्रवास पूर्ण करून २३ व्या वर्षात पदार्पण केले आहे. संघात आजीव, वार्षिक, महिला व पुरुष असे मिळून २२५ सभासद आहेत. परिसर स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, आरोग्य शिबिरे, वृद्धाश्रमांना देणगी, तसेच प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी सभासदांचे वाढदिवस साजरे करून शुभेच्छा कार्यक्रम अशा विविध सामाजिक उपक्रमांचे सातत्याने आयोजन करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.
सभेत उपाध्यक्ष शिवाजीराव ससे, उषा फिरोदिया, सहसचिव नानासाहेब दळवी यांच्यासह श्रीकृष्ण लांडगे, ज्ञानेश्वर कविटकर, बाळकृष्ण पात्रे, विलास मुळे, श्रीधर नांगरे, अनिल मुथा, सुधीर झरकर, दत्तात्रय लोखंडे आणि संघाचे अनेक सदस्य उपस्थित होते.
यावेळी सोपानराव मुळे, बांदल सर, साबळे सर, नाणेकर व क्षीरसागर यांनी चर्चेत सहभागी होत संघाच्या कार्याचे कौतुक केले तसेच विविध सूचना मांडल्या. सदस्यांच्या सूचनांची दखल घेऊन त्यावर सकारात्मक कार्यवाही करण्यात येईल, असे सचिव अशोक आगरकर यांनी आश्वासन दिले.
Human Right | लोकशाहीचा प्राणवायू धोक्यात? महाराष्ट्राच्या नव्या RTI कायद्याविरोधात जनांदोलनाची गरज
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.



