अहमदनगर | २२.७ | रयत समाचार
(Cinema Food Prices) सिनेमा थिएटरमध्ये तिकिटांच्या तुलनेत खाद्यपदार्थ अवाजवी दराने विकले जात असल्याचा आरोप करत अरुणकाका वृक्ष संवर्धन संघटनेने जिल्हाधिकारी, अहिल्यानगर यांच्याकडे निवेदन सादर केले आहे. थिएटरमधील खाद्यपदार्थांच्या किंमतींवर नियंत्रण आणण्याची मागणी करत, अन्यथा आंदोलनाचा इशाराही संघटनेने दिला.
(Cinema Food Prices) संघटनेच्या निवेदनानुसार, पूर्वी मोठ्या संख्येने नागरिक चित्रपटगृहात चित्रपट पाहण्यासाठी जात असत. मात्र, सध्या तिकीटासोबतच खाद्यपदार्थांच्या अवाजवी किमतींमुळे प्रेक्षकांची आर्थिक लूट होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. केवळ २० रुपयांना मिळणारे पॉपकॉर्न थिएटरमध्ये १०० ते ५०० रुपयांपर्यंत विकले जात असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. तसेच १० रुपयांचा चहा, कॉफीही १०० ते २०० रुपयांना विकली जात असल्याचे नमूद करण्यात आले.
(Cinema Food Prices) तिकिटांच्या दरातही मोठी वाढ झाल्याने थिएटर चालकांनी खाद्यपदार्थ मोफत उपलब्ध करून द्यावेत, अशी आगळीवेगळी मागणी संघटनेने केली आहे. तसेच चित्रपटगृहांबाहेर वाहन पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून देण्याचीही मागणी करण्यात आली.
प्रशासनाने या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास नागरिकांच्या सहभागातून मोर्चा, आंदोलन आणि उपोषण करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला.
संघटनेचे म्हणणे आहे की, ग्राहकांची आर्थिक पिळवणूक थांबवण्यासाठी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून चित्रपटगृहांतील खाद्यपदार्थांच्या किंमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक निर्णय घ्यावेत.
🎬 सिनेमा थिएटरमध्ये पॉपकॉर्न, चहा- कॉफीचे दर गगनाला भिडले? अरुणकाका वृक्ष संवर्धन संघटनेची आगळीवेगळी मागणी – “महाग विक्री नको, खाद्यपदार्थ मोफत द्या!” प्रशासनाला निवेदन; अन्यथा आंदोलनाचा इशारा. #Ahmednagar #Cinema #MovieTheatre #ConsumerRights #RayatSamachar
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.



