अहमदनगर | २ मे | प्रतिनिधी
(Rip news) विधानपरिषदेचे माजी आमदार अरूण जगताप यांचे निधन झाले असून अंतिम पार्थिव दर्शन आज शुक्रवारी ता.२ मे ला दुपारी २ वा. भवानीनगर येथील होणार. ते ‘काका’ म्हणून सर्वत्र परिचित होते.
(Rip news) त्यांचा अंत्यविधी आजच शुक्रवार ता.२ मे ला दुपारी ४ वाजता नालेगाव अमरधाम येथे होईल तर अंत्यविधी मार्ग भवानीनगर, निवासस्थानापासून महात्मा फुले चौक- मार्केटयार्ड- जिल्हा सहकारी बँक- स्वस्तिक चौक- टिळकरोड मार्गे आयुर्वेद कॉलेज- बाबावाडी नालेगाव अमरधाम असा असेल.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माहिती श्रध्दांजली
भावपूर्ण श्रद्धांजली!
माजी आमदार श्री. अरुणकाका जगताप यांच्या दुःखद निधनानं राजकारण, समाजकारण, कला, क्रीडा, शिक्षण, सहकार अशा अनेक क्षेत्रात कार्यरत असलेलं, सामान्यांची घट्ट नाळ जुळलेलं कर्तृत्ववान नेतृत्व हरपलं आहे. तत्कालीन अहमदनगर नगरपालिकेचे अध्यक्ष, जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष, आयुर्वेद शास्त्र मंडळाचे अध्यक्ष, प्रयोगशील शेतकरी, वारकरी संप्रदायाचा सच्चा पाईक म्हणून ते कायम अहिल्यानगरवासियांच्या लक्षात राहतील. त्यांचं निधन ही अहिल्यानगर जिल्ह्याची मोठी हानी असून त्यांच्या निधनाचा धक्का पचवण्याची शक्ती त्यांचे पुत्र आमदार संग्राम जगताप, संपूर्ण जगताप कुटुंबिय आणि कार्यकर्त्यांना मिळो. आम्ही सर्वजण जगताप कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत. दिवंगत अरुणकाकांच्या आत्म्यास सद्गती लाभो, ही प्रार्थना.
हे ही वाचा : health | मृत्युनंतर दुसऱ्यांना जीवनदान द्या, पुढाकार घेऊन अवयवदान करा; Toll-Free Number : 1800-11-4770
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.