Ad imageAd image

Culture | शिवप्रहार शिवजयंती उत्सवाची भव्य तयारी; शिवप्रेमींनी सहभागी होण्याचे आवाहन 

रयत समाचार वृत्तसेवा
1 Min Read
SubEditor | Dipak Shirasath

अहमदनगर | १८.२ | रयत समाचार

(Culture) शिवप्रेमींसाठी अभिमानाचा आणि उत्साहाचा क्षण जवळ आला आहे. अहिल्यानगर येथे शिवप्रहार संघटनेच्या वतीने गुरुवारी ता. १९ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ६.०० वाजता भव्य शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याची जोरदार तयारी सुरू असून शहरात उत्सवी वातावरण निर्माण झाले आहे, अशी माहिती संजीव भोर यांनी दिली.

(Culture) कार्यक्रमाचे आयोजन अहिल्यादेवी होळकर चौक, भिस्तबाग, अहिल्यादेवी होळकर रोड, सावेडी, अहिल्यानगर येथे करण्यात आले आहे. यावेळी हलगी पथक, पारंपरिक वाद्य व खेळ, तसेच आकर्षक लाईटिंग शो हे प्रमुख आकर्षण असणार असून, शिवचरित्राच्या प्रेरणादायी विचारांनी दरवर्षीप्रमाणे वातावरण भारावून जाणार आहे.

(Culture) कार्यक्रमाला जरूर उपस्थिती राहण्याचे आवाहन संजीव भोर पाटील (संस्थापक, शिवप्रहार संघटना, महाराष्ट्र राज्य, राज्य प्रवक्ता शिवसेना तथा सहसंपर्क प्रमुख अहिल्यानगर जिल्हा यांनी केले.

शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रम, स्वराज्य संकल्पना आणि राष्ट्रनिष्ठ विचारांचा जागर कार्यक्रमातून होणार असून, सर्व शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. शिवप्रहार संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत.


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading