Ad imageAd image

Literature | साहित्यप्रेमींसाठी पर्वणी; 19 फेब्रुवारीपासून ‘सकाळ पुस्तक महोत्सव’ सुरू

रयत समाचार वृत्तसेवा
1 Min Read
SubEditor | Dipak Shirasath

अहमदनगर | १८.२ |प्रतिनिधी

(Literature) साहित्य, वाचनसंस्कृती आणि विचारांचे अनमोल पर्व साजरे करण्यासाठी ‘सकाळ माध्यम समूह’ व अहिल्यानगर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सकाळ पुस्तक महोत्सव २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. १९ ते २२ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत सावेडी येथील जॉगिंग पार्कमध्ये हा महोत्सव उत्साहात पार पडणार आहे.

(Literature) सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत सुरू राहणाऱ्या या महोत्सवात साहित्य आणि संस्कृतीचा खऱ्या अर्थाने उत्सव अनुभवायला मिळणार आहे. विविध नामांकित प्रकाशक, पुस्तक विक्रेते यांचा सहभाग असलेले भव्य ग्रंथप्रदर्शन हे या महोत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे. तसेच शहरातील शाळा, कॉलेज आणि ग्रंथालयांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग अपेक्षित आहे.

(Literature) महोत्सवात नामवंत लेखक, कवी, साहित्यिक आणि विचारवंत यांच्या व्याख्यानांचे व परिसंवादांचे आयोजन करण्यात आले असून साहित्यप्रेमींसाठी हा ज्ञानसोहळा ठरणार आहे. वाचनसंस्कृतीला चालना देण्यासाठी आणि नव्या पिढीला पुस्तकांकडे वळवण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
साहित्य आणि संस्कृतीचा हा उत्सव सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून यशस्वी करावा, असे आवाहन सहसंपादक प्रकाश पाटील, अशोक राजे निंबाळकर, गोरक्षनाथ बांदल, समीर दानी, नवनाथ खराडे आदींनी केले.

हे ही वाचा : Public issue | महापालिकेचा महत्त्वपूर्ण निर्णय; रस्त्यांवरील अपघातात जखमी वा मृत्यू झाल्यास मिळणार नुकसान भरपाई; प्रशासक यशवंत डांगे यांचे अर्ज करण्याचे आवाहन

India news | कहाणी गंगाबाईंच्या ‘मिथिला व मैथिल राजवंशाचा इतिहास’ पुस्तकाची; ईसमाद प्रकाशनचे 1 पहिले मराठी पुस्तक


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading