अहमदनगर | १.४ | रयत समाचार
(Rip news) येथील काकासाहेब म्हस्के शैक्षणिक संकुलाचे संस्थापक डाॅ. सुभाष किसनराव म्हस्के (वय ८०) यांचे निधन. नगरच्या अमरधाममध्ये झाले अंत्यसंस्कार. डॉ. म्हस्के यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, जावई, सुन, नातवडे असा परिवार आहे.
(Rip news) डॉ. सुभाष म्हस्के प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ होते. त्यांचा जन्म १० ऑगस्ट १९४६ रोजी नगर जिल्ह्यातील उक्कडगाव येथे झाला. ते शिक्षणतज्ज्ञ आणि माजी आमदार काकासाहेब म्हस्के यांचे सुपुत्र होत. त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. पुढे एमएस (MS) ऑर्थोपेडिक्स ही पदवी संपादन केली. पुण्यातील ससून रुग्णालयात अनेक वर्षे सेवा बजावली. तेथेच त्यांनी अस्थिरोग तज्ज्ञ म्हणून आपली ओळख निर्माण केली.
(Rip news) वडिलांच्या नावाने काकासाहेब म्हस्के मेमोरियल मेडिकल फाउंडेशन या संस्थेची स्थापना केली. या संस्थेमार्फत त्यांनी नगरमध्ये वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय आणि नर्सिंग संस्था सुरू केल्या. ग्रामीण भागातील रुग्णांना उच्च दर्जाची आणि परवडणारी आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे हे त्यांच्या कामाचे मुख्य उद्दिष्ट राहिले.
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.
