नगर तालुका | २४ सप्टेंबर | प्रतिनिधी
Rip Message तालुक्यातील घोसपुरी येथील शेतकरी दत्तात्रय झरेकर यांचे आकस्मिक निधन झाले. दत्तात्रय झरेकर आ. बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेमध्ये कार्यरत होते. शेतकरी आंदोलनामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. सरकारी अधिकारी व कर्मचारी हे खोटे बनावट दिव्यांग प्रमाणपत्र घेऊन नोकरी आणि बदल्यांमध्ये लाभ मिळवतात या विरोधात आ. बच्चू कडू यांच्या नेतृत्वात दत्ता झरेकर काम करत होते.
माहिती अधिकाराच्या माध्यमातून ते विविध शासकीय कार्यालयात चालू असलेला भ्रष्टाचार समाजासमोर आणि योग्य त्या न्यायव्यवस्थेसमोर आणत होते. नुकतेच पुणे येथे नोंदणी महानिरीक्षक कार्यालयातील भ्रष्टाचाराच्या संबंधी त्यांनी उपोषण आंदोलन देखील केले होते. अजय महाराज बारस्कर यांच्याबरोबर वारकरी सांप्रदायिक कार्यरत असून भंडारा डोंगर येथील वारकरी संस्थेचे ते विश्वस्त होते. त्या माध्यमातून अनाथ निराधारांना सांभाळण्याचे काम ते करत होते.
त्यांच्या पाठीमागे पत्नी, मुलगा, सून, भाऊ, आई असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत असून नगर तालुका पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा
हे हि वाचा : श्रीगोंद्याचे थोर वारकरी संत : शेख महंमद – टी.एन.परदेशी यांची ‘साहित्यवार्ता’ वाचा
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.