Press | पत्रकारांसाठी कडक नियम; अधिकृत परवानगीशिवाय मतदान केंद्रात प्रवेश नाही

रयत समाचार वृत्तसेवा
2 Min Read
SubEditor | Dipak Shirasath

नवी दिल्ली | १८.४ | रयत समाचार

(Press) आगामी सार्वत्रिक व पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय निवडणूक आयोगाने माध्यम प्रतिनिधींसाठी कडक आणि स्पष्ट नियमावली जाहीर केली आहे. मतदानाच्या दिवशी वार्तांकनासाठी आता पत्रकारांना अधिकृत Authority Letter अनिवार्य करण्यात आले असून, अनधिकृत प्रवेशावर पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे.

(Press) निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, मतदान केंद्रांवरील माध्यम प्रतिनिधींचा प्रवेश Conduct of Election Rules, 1961 च्या नियम 32 नुसार मतदान केंद्राध्यक्षांच्या नियंत्रणाखाली राहणार आहे. त्यामुळे प्रत्येक पत्रकाराला नियमानुसार परवानगी घेणे बंधनकारक ठरणार आहे.

(Press) अर्ज व पडताळणी प्रक्रिया कडक : माध्यम प्रतिनिधींना कव्हरेजसाठी अर्ज Press Information Bureau (PIB) किंवा राज्याच्या माहिती व जनसंपर्क संचालनालय (DIPR) मार्फत करावा लागणार आहे. या अर्जांची बहुस्तरीय पडताळणी केली जाईल. पात्र उमेदवारांची अंतिम यादी निवडणूक आयोगाकडे मंजुरीसाठी पाठवली जाईल.
फक्त खरे पत्रकारच पात्र : संबंधित अधिकाऱ्यांकडून अर्जदार हे खरे माध्यम प्रतिनिधी असल्याचे प्रमाणित केले जाणार असून, आयोगाच्या सर्व निकषांची पूर्तता केल्यानंतरच अधिकृत पत्र जारी केले जाईल. विशेष म्हणजे, या प्रक्रियेत फॅसिमाइल स्वाक्षरी किंवा रबर स्टॅम्प वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे.
मतदान कक्षात छायाचित्रणास सक्त मनाई : मतदानाच्या गोपनीयतेस प्राधान्य देत आयोगाने स्पष्ट केले आहे की, कोणत्याही माध्यम प्रतिनिधीस मतदान कक्षात प्रवेश करून फोटो किंवा व्हिडिओ शूटिंग करण्यास सक्त मनाई असेल. नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधित पत्रकारावर कठोर कारवाई होणार असून त्यांचे अधिकृत परवाना रद्द केला जाईल.
पत्रकारांना ‘अत्यावश्यक सेवा’ दर्जा : महत्त्वाची बाब म्हणजे, अधिकृत परवानगी मिळालेल्या माध्यम प्रतिनिधींना ‘अत्यावश्यक सेवा’ (Essential Services) मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे मतदानाच्या दिवशी कार्यरत पत्रकारांना Postal Voting Centre (PVC) मार्फत मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.
एकूणच, पारदर्शकता, सुरक्षितता आणि निवडणूक प्रक्रियेची शिस्त राखण्यासाठी ही कडक नियमावली लागू करण्यात आल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.
Biodiversity | अहिल्यानगरचा ‘किंगफिशर’ आता पाण्याच्या बाटलीवर; ‘डेक्कन व्हॅली’ मिनरल वॉटर


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

TAGGED:
Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading