Pratima Kulkarni Award प्रतिमा हेरंब कुलकर्णींना ‘कर्तृत्ववान महिला’ पुरस्कार; 50 हजारांचे पारितोषिक

Pratima Kulkarni Award | एकल महिलांच्या पुनर्वसनातील कार्याची दखल; प्रतिमा हेरंब कुलकर्णींना ‘कर्तृत्ववान महिला’ पुरस्कार

rayatsamachar
1 Min Read
एकल महिलांच्या पुनर्वसनासाठीच्या कार्याबद्दल ‘कर्तृत्ववान महिला’ पुरस्काराच्या मानकरी प्रतिमा हेरंब कुलकर्णी. SubEditor | Dipak Shirsath

अकोले | १५.८ | रयत समाचार

(Pratima Kulkarni Award) एकल महिलांच्या पुनर्वसनासाठी सातत्याने कार्य करणाऱ्या प्रतिमा हेरंब कुलकर्णी यांना मधुरजग फाउंडेशनच्या वतीने ‘कर्तृत्ववान महिला’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार उद्या, रविवार १६ ऑगस्ट रोजी मुळशी (पुणे) येथील गिरिराज रिसॉर्ट येथे प्रदान करण्यात येणार आहे.

(Pratima Kulkarni Award) एकल महिलांना सामाजिक आधार मिळवून देणे, त्यांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न करणे आणि त्यांना सन्मानाने जीवन जगण्यासाठी सक्षम करण्याच्या क्षेत्रात कुलकर्णी करीत असलेल्या कार्याची दखल घेत हा पुरस्कार देण्यात येत आहे. पुरस्काराचे स्वरूप ५० हजार रुपये असे आहे.
(Pratima Kulkarni Award) सामाजिक राजकीय अभ्यासक कॉ. अजित अभ्यंकर आणि मिळून साऱ्या जणी मासिकाच्या संपादक गीताली वि. म. यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. मधुरजग फाउंडेशनचे जगदीश काबरे आणि कुमार नागे यांनी ही माहिती दिली.

Observational Short Film | चित्रपटनिर्मिती शिकणाऱ्यांसाठी : निरीक्षणप्रधान लघुपट म्हणजे काय?

- Advertisement -

Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading