Politics | विजय यांची भाकप मुख्यालयाला भेट; राष्ट्रीय राजकारणात नव्या चर्चांना उधाण - Rayat Samachar

Politics | विजय यांची भाकप मुख्यालयाला भेट; राष्ट्रीय राजकारणात नव्या चर्चांना उधाण

rayatsamachar
1 Min Read
SubEditor | Dipak Shirasath

नवी दिल्ली | १०.६ | रयत समाचार

(Politics) तामिळनाडूतील लोकप्रिय अभिनेते आणि तमिळगा वेत्री कळघम (TVK) पक्षाचे नेते सी. जोसेफ विजय (थलपती विजय) यांनी आज भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (CPI) नवी दिल्लीतील अजय भवन या केंद्रीय मुख्यालयाला भेट दिली. या भेटीमुळे राष्ट्रीय राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले.

- Advertisement -

(Politics) यावेळी विजय यांचे भाकपाचे राष्ट्रीय सरचिटणीस डी. राजा यांनी स्वागत केले. यावेळी पक्षाच्या राष्ट्रीय सचिवालयाचे सदस्य रामकृष्ण पांडा, ज्येष्ठ नेते पल्लब सेनगुप्ता आणि के. नारायण उपस्थित होते.

(Politics) बैठकीदरम्यान देशातील सध्याची राजकीय परिस्थिती, लोकशाही मूल्यांचे संरक्षण, सामाजिक न्याय, धर्मनिरपेक्षता तसेच जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर चर्चा झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. आगामी तामिळनाडू विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विजय यांच्या या भेटीकडे विशेष लक्ष वेधले जात आहे.

राजकारणात सक्रिय झाल्यानंतर विजय यांनी विविध सामाजिक आणि लोकहिताच्या मुद्द्यांवर भूमिका घेतली असून, त्यांच्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या मुख्यालय भेटीमुळे विरोधी पक्षांमधील संभाव्य संवाद आणि सहकार्याच्या शक्यतांबाबतही चर्चा सुरू झाली.

India news | आरक्षण, स्पर्धा परीक्षा आणि लॅटरल एन्ट्री : नेमकं कुणासाठी चाललंय सरकार?


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading