(Politics) जागतिक योग दिनाचे औचित्य साधत भाजपा शहर जिल्हा व्यापारी आघाडी व जिजाऊ फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने सिताबन लॉन, मार्केटयार्ड रोड येथे भव्य योगसत्राचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात सुमारे ३०० हून अधिक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत योग, नृत्य व संगीताचा लाभ घेतला. कार्यक्रमास भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष ॲड. अभय आगरकर, जिजाऊ फाऊंडेशनच्या संस्थापिका मनीषा गुगळे, भाजपाचे सरचिटणीस प्रशांत मुथ्था, सचिन पारखी, व्यापारी आघाडी अध्यक्ष महेश गुगळे, सरचिटणीस हर्षल बोरा, उपाध्यक्ष नीरज राठोड व संजय कांगला, भिंगार मंडलाध्यक्ष लक्ष्मीकांत तिवारी, गोपाल वर्मा, प्रशांत बुऱ्हाडे, सुरेश लालबागे, रुपेश वर्मा आदी मान्यवर उपस्थित होते.
(Politics) यावेळी बोलताना ॲड. आगरकर म्हणाले, आंतरराष्ट्रीय योग दिन ही संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारामुळे साकार झाली असून, योग हे केवळ शरीर नव्हे तर मनासाठीही अत्यंत आवश्यक आहे. योगामुळे आरोग्य उत्तम राहते आणि समाज अधिक सशक्त होतो.
(Politics) यावेळी मनीषा गुगळे यांनी सांगितले, जिजाऊ फाऊंडेशनच्या माध्यमातून दररोज शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी योग, प्राणायाम, हास्य व विविध व्यायाम प्रकारांचे वर्ग घेतले जातात. १८ ते ८० वयोगटातील स्त्री-पुरुष येथे नियमितपणे येतात. आमचे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण कुटुंबातील सदस्य एकत्र येऊन योगसाधना करतात.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेश गुगळे यांनी केले तर आभार प्रदर्शन हर्षल बोरा यांनी मानले. कार्यक्रमात उपस्थित सर्वांनी सामूहिक योग सत्रात सहभागी होत जागतिक योगदिन उत्साहात साजरा केला.