Politics | अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचा संताप; सामनगावात भाकपचा रास्तारोको; प्रतिहेक्टर 70 हजार हक्काची मागणी

Politics | अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचा संताप; सामनगावात भाकपचा रास्तारोको; प्रतिहेक्टर 70 हजार हक्काची मागणी

शेवगाव | ०९.१० | रयत समाचार

(Politics) अतिवृष्टी आणि पूरामुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी सामनगाव येथे भारतीय कम्युनिस्ट पक्षासह किसान सभेच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी “शेतकऱ्यांचा अपमान आम्हाला मान्य नाही!”, “प्रतिहेक्टर सत्तर हजार मदत द्या!” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.Politics

(Politics) गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शासनाच्या आकडेवारीनुसार २७ लाख हेक्टर शेती बाधित झाल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात ७० लाख हेक्टरपेक्षा जास्त शेती पाण्याखाली गेली असल्याचा दावा आंदोलकांनी केला. उभी पिके वाहून गेली, शेतजमीन नष्ट झाली, जनावरांचे मृत्यू झाले आणि अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत.

(Politics) सरकारने जाहीर केलेली भरपाई ही मदत नव्हे, तर शेतकऱ्यांची थट्टा आहे, असा संताप भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव कॉ. ॲड. सुभाष लांडे यांनी आंदोलनस्थळी व्यक्त केला. ते म्हणाले, कोरडवाहूसाठी ८५००, बागायतीसाठी २७ हजार आणि फळबागांसाठी ३२ हजार रुपयांची तुटपुंजी मदत म्हणजे शासनाची निर्दयता आहे. हे सरकार अदानी-अंबानींसाठी उदार, पण शेतकऱ्यांसाठी निर्दयी ठरले आहे. शेतकरी मरत असताना विमा कंपन्या आणि कॉर्पोरेट घराणी मात्र शासनाच्या कृपादृष्टीने अब्जावधी कमावतात, असा आरोप त्यांनी केला.Politics
आंदोलनात प्रति हेक्टर किमान ७० हजार रुपयांची तातडीची मदत, शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्जमाफ, फळबाग, जनावरे, घरांची पडझड आणि पूरक व्यवसायांची नुकसान भरपाई, तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करणे अशा ठोस मागण्या करण्यात आल्या. आंदोलनाचे मागणीपत्र सहाय्यक कृषी अधिकारी अमोल राऊत यांनी स्वीकारले.
रास्ता रोकोत ॲड. सुभाष लांडे, बबनराव पवार, संदीप इथापे, बापुराव राशीनकर, ॲड. भागचंद उकिरडे, राम लांडे, सरपंच आदिनाथ कापरे, गोरक्षनाथ काकडे, रमेश पाटील कापरे, ॲड. लक्ष्मण बोरुडे, विष्णू गोरे, भिवसेन घोरपडे, अंजाबापू गायकवाड यांच्यासह शेकडो शेतकरी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
आंदोलनानंतर परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असले तरी पोलिसांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत परिस्थिती नियंत्रणात ठेवली. यावेळी शेतकऱ्यांनी इशारा, आमचा हक्क न दिल्यास पुढील लढा आणखी तीव्र करू!

हे ही वाचा : Social | सामाजिक संघर्ष कमी करण्याचे ‘भिवंडी मॉडेल’; ‘खोपडे पॅटर्न’ : एक भारतीय प्रयोग, जागतिक मान्यता

India news | कहाणी गंगाबाईंच्या ‘मिथिला व मैथिल राजवंशाचा इतिहास’ पुस्तकाची; ईसमाद प्रकाशनचे 1 पहिले मराठी पुस्तक

अहमदनगर आंदोलन कृषि सत्ताकारण