Politics: मनवि सेना विद्यार्थी सुरक्षेच्या मुद्द्यावर कोणताही हलगर्जीपणा खपवून घेणार नाही – जिल्हाध्यक्ष संकेत लोंढे; १८ पासून करणार झाडाझडती; त्रुटी असणाऱ्या शाळा पाडणार तात्काळ बंद !

70 / 100 SEO Score

राहुरी | १६ सप्टेंबर | प्रतिनिधी

Politics महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना विद्यार्थी सुरक्षेच्या मुद्द्यावर कोणताही हलगर्जीपणा खपवून घेणार नाही, असा इशारा जिल्हाध्यक्ष संकेत लोंढे यांच्यासह जिल्हा संघटक सागर माने, तालुकाध्यक्ष संदेश पाटोळे, तालुका उपाध्यक्ष नवनाथ शेंडगे, शहराध्यक्ष संदेश गायकवाड, शहर उपाध्यक्ष प्रसाद गुंजाळ आदींनी दिला.

याबाबत अधिक माहिती देताना संकेत लोंढे यांनी सांगितले, बदलापूरचे प्रकरण दुर्दैवी असले तरी त्याला प्रशासकीय गोष्टीपण जबाबदार आहेत. ही नाण्याची दुसरी बाजूदेखील समजून घेतली पाहिजे. शाळा आणि महाविद्यालयात पालक आपले पाल्य प्रशासनाच्या विश्वासावर पाठवत. त्याच ठिकाणी जर गैरकृत्याच्या निमित्ताने पाल्यासोबत वाईट होत असेल तर ते थांबवण्याची जबाबदारी प्रशासनाने घेणे गरजेचे आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने गेल्या आठवड्यात शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले की, जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयच्या आवारात सीसीटीव्ही कॅमेरे बसवा. येथे काम करणाऱ्या सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र करून घ्या. याबाबत उदासीनता दिसून येत आहे. आम्ही सर्व शाळांनाच थेट आवाहन करत आहोत की, मंगळवारी ता. १७ सप्टेंबरपर्यंत वरील बाबींची पूर्तता करावी. अन्यथा बुधवारी ता.१८ सप्टेंबरपासून मनविसेने प्रत्येक शहर आणि तालुकानिहाय चार पथक तयार केले आहेत. संपूर्ण जिल्ह्यात एकाच वेळी तपासणा हाती घेतली जाणार आहे. सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये सर्वे करणार आणि जेथे अशा प्रकारच्या त्रुटी आढळतील ती शाळा तात्काळ बंद पाडण्यात येईल. त्या शाळेतील विद्यार्थ्यांना त्याच दिवशी सुट्टी जाहीर करून घरी पाठवण्यात येईल. हे आंदोलन करण्यासाठी प्रशासनानेच आम्हाला मजबूर केलेले आहे. कारण जे काम शासनाचा पगार घेऊन अधिकाऱ्यांनी केले पाहिजे ते काम जर आम्ही करत आहोत तर याला प्रशासनच जबाबदार आहे.

ते पुढे म्हणाले, सर्व शाळा आणि महाविद्यालय प्रशासनाला विनंती करीत आहोत की, कोणताही अनुचित प्रकार घडू देऊ नका. आमची तशी इच्छा देखील नाही, पण आमच्या पाल्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना कधीही दुय्यम स्थानी ठेवणार नाही याची आपण दखल घ्यावी.

सर्व्हे पथकामधे राज्य उपाध्यक्ष सुमित वर्मा, राज्य कार्यकारिणी सदस्य किरण शिंदे, मनविसे नगर जिल्हाध्यक्ष संकेत लोंढे तसेच जिल्हा संघटक सागर माने यांचा समावेश आहे.

कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा

हे हि वाचा : श्रीगोंद्याचे थोर वारकरी संत : शेख महंमद – टी.एन.परदेशी यांची ‘साहित्यवार्ता’ वाचा

 

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *