अहमदनगर | २९ जुलै | प्रतिनिधी
(Literature) नुकतेच निधन झालेले ख्यातनाम लेखक, कवी, ‘जीवनमार्ग’ साप्ताहिकाचे संपादक मंडळ सदस्य आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सांस्कृतिक कमिटीचे सदस्य कॉम्रेड सुभाष थोरात यांनी पुरोगामी चळवळीतील निवडक विचारवंतांच्या मुलाखती घेतल्या होत्या. त्या संपादित करून ‘विचारवंतांच्या मुलाखती’ हा ग्रंथ वाचकांसमोर येत आहे.
(Literature) या ग्रंथाचे प्रकाशन गुरुवार, ३१ जुलै रोजी संध्याकाळी ५ वाजता सर्जेपुरा, अहिल्यानगर येथील रहेमत सुलतान हॉल येथे होणार असल्याची माहिती सोनाली देवढे – शिंदे यांनी दिली.
(Literature) संवादक सुभाष थोरात यांचे निधन महिनाभरापूर्वी दीर्घ आजाराने झाले. त्यांच्या पश्चात या पुस्तकाचे प्रकाशन करण्याची जबाबदारी समविचारी मित्रांनी घेतली आहे.
या प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्षपद सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा. डॉ. प्रतिभा अहिरे भूषवणार आहेत. पुण्याच्या सामाजिक कार्यकर्त्या किरणताई मोघे आणि लोकसांस्कृतिक मंचचे कॉ. सुबोध मोरे हे विशेष उपस्थित राहतील. या ग्रंथावर समीक्षणपर भाष्य प्रा. डॉ. सुधाकर शेलार आणि प्राचार्य डॉ. शिरीष लांडगे करणार आहेत. पुस्तकाचे संपादन डॉ. श्रीधर पवार आणि राजीव देशपांडे यांनी केले असून तेही कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. मुंबईतील ‘ललित प्रकाशन’ यांनी हे पुस्तक प्रकाशित केले आहे.
शहरासह जिल्हाभरातील पुरोगामी विचारांचे कार्यकर्ते, युवक, तरुण, महिला आदींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मराठा सेवा संघाचे महानगर प्रमुख इंजि. अभिजीत एकनाथ वाघ यांनी केले आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भारतीय जनसंसदचे अशोक सब्बन, सामाजिक कार्यकर्त्या संध्याताई मेढे, युनूसभाई तांबटकर, अॅड. विद्या जाधव-शिंदे आदी परिश्रम घेत आहेत.
हे ही वाचा : India news | कहाणी गंगाबाईंच्या ‘मिथिला व मैथिल राजवंशाचा इतिहास’ पुस्तकाची; भैरवनाथ वाकळे संपादित ‘इसमाद प्रकाशन’चे पहिले मराठी पुस्तक
india news | अहमदनगरमधे शिक्षणाचे 1 ले बीज लावणारी ‘अमेरिकन मराठी मिशनरी’ – कामिल पारखे

