Literature | मराठी भाषा गौरवदिनी ‘श्रोता’ची डिजिटल पर्वणी; ऑडिओबुक अ‍ॅप सर्वांसाठी मोफत

साहित्याचा आवाज आता प्रत्येक घरात

Subeditor | Dipak Shirasath

अहमदनगर | १.३ | रयत समाचार

(Literature) मराठी भाषा गौरवदिनी म्हणजेच कविवर्य कुसुमाग्रज जयंतीचे औचित्य साधत ‘श्रोता’ हे मराठी ऑडिओ बुक अ‍ॅप ता.२७ फेब्रुवारीपासून सर्वांसाठी मोफत उपलब्ध करण्यात आले असल्याची माहिती कृषीरंग प्रकाशनच्या माधुरी सचिन चोभे यांनी दिली. आधुनिक आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञान आणि साहित्याचा सुंदर संगम घडवणारे हे अ‍ॅप मराठी वाचक, श्रोत्यांसाठी एक नवा डिजिटल मंच ठरणार आहे.

(Literature) अँड्रॉइड प्लॅटफॉर्मवर गुगल प्ले स्टोअरवर हे अ‍ॅप प्रकाशित झाले असून, केवळ फेसबुकवरील जाहिरातीद्वारे तीन दिवसांत दोनशेपेक्षा अधिक वाचकांनी ते डाउनलोड केले आहे. श्रवणम सॉफ्ट सोल्युशन एलएलपीचे संचालक व लेखक सचिन मोहन चोभेसचिन मोहन चोभे यांनी ही माहिती दिली.

(Literature) विविध विषयांचा समृद्ध खजिना :श्रोता’ अ‍ॅपमध्ये विविध साहित्यप्रकारांचा मोठा संग्रह उपलब्ध आहे. यामध्ये कादंबऱ्या, गुन्हे व रहस्यकथा, भयकथा, संत साहित्य, अभंग व आध्यात्मिक ग्रंथ, बालसाहित्य व परीकथा, शैक्षणिक व वैज्ञानिक माहितीपर पुस्तके, प्रेरणादायी भाषणे व माहितीपटांचा समावेश आहे. लहान मुले, विद्यार्थी, युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि साहित्यप्रेमी अशा सर्व वयोगटांसाठी हे अ‍ॅप उपयुक्त ठरणार आहे.

कुठेही, कधीही ऐका पुस्तके : स्मार्टफोनवर सहज डाउनलोड करता येणारे ‘श्रोता’ अ‍ॅप ऑफलाइन मोडमध्येही पुस्तके ऐकण्याची सुविधा देते. स्पष्ट आवाज, व्यावसायिक निवेदक, सोपा वापरकर्ता इंटरफेस आणि आकर्षक डिझाइन ही त्याची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. प्रवासात, व्यायाम करताना किंवा मोकळ्या वेळेत साहित्य ऐकण्याचा आनंद आता सहज शक्य झाला आहे.

वाचनाची आवड कमी झालेली नाही; मात्र वेळेअभावी वाचकांना पर्यायांची गरज भासते आहे. ऐकण्याची संस्कृती झपाट्याने वाढत आहे. ‘श्रोता’च्या माध्यमातून आम्ही प्रत्येक घरात मराठी साहित्याचा आवाज पोहोचवू इच्छितो, असे संस्थापकांनी सांगितले.

नवोदित लेखकांसाठी सुवर्णसंधी :श्रोता’ हे केवळ श्रोत्यांसाठीच नव्हे, तर नवोदित लेखक आणि प्रकाशकांसाठीही एक सक्षम व्यासपीठ ठरणार आहे. ऑडिओ व प्रिंट अशा संयुक्त प्रकाशनाच्या संधी, रॉयल्टी, शेअर मॉडेल आणि व्यापक डिजिटल पोहोच यामुळे साहित्य क्षेत्रात नवे दालन खुले झाले आहे.Literature

डिजिटल युगातील मराठी साहित्याची नवी दिशा : आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत पुस्तक हातात घेऊन बसणे सर्वांना शक्य नसते; मात्र ऑडिओ बुकच्या माध्यमातून साहित्य कानातून मनात उतरते. ‘श्रोता’ अ‍ॅप मराठी भाषेचा गोडवा, कथांचा थरार आणि ज्ञानाचा खजिना डिजिटल स्वरूपात सर्वांपर्यंत पोहोचवणारे महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे. मराठी साहित्याच्या नव्या डिजिटल पर्वाची ही सुरुवात ठरावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Shrota app डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करावे.

हे ही वाचा : Public issue | महापालिकेचा महत्त्वपूर्ण निर्णय; रस्त्यांवरील अपघातात जखमी वा मृत्यू झाल्यास मिळणार नुकसान भरपाई; प्रशासक यशवंत डांगे यांचे अर्ज करण्याचे आवाहन

India news | कहाणी गंगाबाईंच्या ‘मिथिला व मैथिल राजवंशाचा इतिहास’ पुस्तकाची; ईसमाद प्रकाशनचे 1 पहिले मराठी पुस्तक

Share This Article